जत | संजय कांबळे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष |

0

जत,प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी  जतचे माजी संरपच संजय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.प्रदेश सचिव विवेक कांबळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. जतसह आटपाडी,तासगाव, कवठेमंकाळ,मिरज या तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.जतचे माजी उपसंरपच,सरपंच,आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आदी पदावर काम करत संजय कांबळे यांनी खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. सतत आरपीआयच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवून पक्षवाढीसाठी काम करत असतात.समाजातील अन्यायाविरोधात आंदोलने मोर्चा या माध्यमातून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे आत्तापर्यंत सुरू ठेवले आहे.जत शहरातील आपला माणूस म्हणून कांबळे परिचित आहेत.जत विधानसभेचीही त्यांनी निवडणूक लढविली होती.तालुक्यातील गावागावात त्यांचा संपर्क आहे.पक्षाने त्यांच्या कार्याचा गौरव करत ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. निवडीनंतर बोलताना कांबळे म्हणाले,जत तालुक्यासह जिल्ह्यात आरपीआयचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा माझा सतत प्रयत्न राहील.या पदाच्या माध्यमातून जनतेच्या न्यायहक्कासाठी काम करत राहू.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.