भरधाव बोलरोच्या धडकेत बालक ठार

0

जत,प्रतिनिधी : अचकनहळ्ळी (ता-जत) येथील रोडवर भरधाव बोलेरो गाडीने धडक दिल्याने बालक ठार झाला.

शिवराज विजयकुमार व्हनकटे (वय-5,रा.जत)असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे.

घटनेची जत पोलिसात नोंद झाली आहे.जत तालुक्यात चार दिवसात

 विविध घटनेत तीन लहानग्याचा मृत्यू झाला आहे.

याबाबत जत पोलिसाने दिलेली माहिती अशी, मृत शिवराज व्हनकटे,त्यांची आई अर्चना व्हनकटे 

व अन्य दोन महिला अचकहळ्ळीतून गावडेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने चालत जात होत्या.

अचानक पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या बलोरो (एमएच-39,एबी-0836)जीपने 

Rate Card

शिवराजला जोराची धडक दिली.तातडीने शिवराजला त्याचं बलोरो गाडीत घालून खासगी 

हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ आणले मात्र तेथे शिवराज दाखल करुन न घेतल्याने 

त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र तो पर्यत रक्तस्राव झाल्याने शिवराजचा मुत्यू झाला.

घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली आहे.विजयकुमार व्हनकटे यांनी 

जत पोलीसात फिर्याद दिली.अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार भोर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.