अपहरण झालेल्या शिवराज यादवचाही मृत्यू,वायफळ प्रकरणी संशयित दोघे ताब्यात ; वज्रवाडसह दोन्ही घटनाचे अद्याप गुढ कायम

0

जत,प्रतिनिधी : वायफळ येथून अपहरण झालेल्या शिवराज यादव या अडीच वर्षाच्या चिमुकल्याचाही घराजवळील विहिरीत मृतदेह रवीवारी सकाळी आढळून आला. सलग मनाला हेलावणाऱ्या दुसऱ्या घटनेने तालुका हळहळला.दोन्ही घटनाचे पूर्णत: तपास लागत नसल्याने गुढ वाढत चालले  आहे.तालुक्यातील वायफळ येथील अपहरण झालेल्या शिवराज यादव यांचा घरापासून अर्ध्या किलोमीटरवरील विहिरीत मृत्तदेह आढळला.तर वज्रवाड येथील अक्षरा मठपती हिच्या मुत्यूचे गुढ अद्याप कायम आहे.तिच्या मृत्तदेहावर मिरज येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. काही चाचणीचे रिपोर्ट येणार आहेत.त्यांनतर अक्षराचे नेमके काय झाले हे कळणार आहे.दोन्ही ठिकाणी पोलीसाकडून कसून तपास सुरू आहे.

वायफळ येथून शुक्रवारी घरासमोरून साडेबारा वाजल्यापासून गायब झालेल्या शिवराजचा गेली तीन दिवस शोध सुरू होता.अखेर रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान घरासमोरील अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत शिवराजचा मृतदेह तरंगताना त्यांच्या आजोबा शिवाजी यादव मोटार चालू करण्यासाठी विहिरीवर गेले असताना दिसला.त्यांनी आरडाओरडा करून कुंटूबियांना सांगितले.पोलीसांनाही खबर दिली.जत पोलीसाच्या पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून त्याच्या उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.शिवराजच्या मृत्तदेह बघून आई वडीलासह कुंटुबियांनी हबरडा फोडला.सुन्न करणाऱ्या घटनेमुळे प्रचंड संताप घटनास्थळी व्यक्त होत होता.दरम्यान शिवराजच्या कुंटुबियांनी संशय व्यक्त केलेले शिवराजचे चुलत चलते व चुलतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Rate Card

शनिवारी वायफळ पासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या यादव वस्ती येथून अडीच वर्षीय शिवराजचे अपहरण झाले होते.

आजोबा शिवाजी यादव यांनी अंगणवाडीतून शिवराजला घरी आणले होते. तो जेवण केल्यानंतर बाहेर खेळायला गेला होता.सुमारे अर्धा तास झाला तरी तो घरी आलाच नाही.शिवराजची आई ज्योतीने आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न केला,मात्र सायंकाळपर्यंत शिवराज सापडला नाही.सायंकाळी अपहरण झाल्याची फिर्याद जत पोलीसात दिली.तेव्हापासून जत पोलीस,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,श्वान पथक,मोबाईल ट्रैकिंग द्वारे शोध सुरू होता.शनीवारी मयत शिवराजचे सैन्यदलात असणारे वडील दिगंबर शिवाजी यादव व चुलते दत्तात्रय शिवाजी यादव आले होते.त्यांनीही शोध सुरू केला होता,पोलीसांची पथके परिसरात ठाण मांडून होते.अखेर रवीवारी शिवराजचा मृत्तदेह आढळला.दरम्यान शिवराजचे चुलत चलते व चुलतीवर कुंटुबियांनी संशय घेत,त्यांच्यावर संप्तत उपस्थितांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी कुमक वाढवत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र घटनास्थळी व गावात तणाव असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलीसांनी दोघांनीही संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून तपास सुरू केला आहे.त्यामुळे घटनेची लवकरच उखल होण्याची शक्यता आहे.दरम्यान दोन्ही घटनेतील अरोपींना लवकरात लवकर शोधून कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.

   वायफळ येथील या विहिरीत शिवराज यादव यांचा मृत्तदेह आढळला

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.