जत,प्रतिनिधी :जत शहरातील सनराज डिजिटल शाॅपी येथे डिजिटल पोस्टर बनविण्यासाठी आलेल्या राजू प्रकाश दोडमणी (रा.उमराणी ता.जत)यांचे पाकिट व त्यात असलेली 25800 रोख रक्कम व पन्नास हजार रक्कम लिहलेला चेक चोरीस गेली होता.अखेर या चोरीचा डिटीजल दुकानातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध लागला आहे.जत एसटी आगारातील कर्मचारी मल्लाप्पा रामू औरसंगे(रा.जत)यांच्या विरोधात पाकीट चोरीप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत जत पोलीसात नोंद झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू दोडमणी हा 5 मार्च रोजी सनराज डिजिटल शाॅपी मध्ये डिजिटल पोस्टर करण्याकरिता गेला होता.त्यावेळी राजू यांच्या खिसातून पाकीट खाली पडले.ते पाठीमागे बसलेले मल्लाप्पा औरसंगे यांनी बघितले.हळूच कुणाला न माहिती होता ते पाकीट तेथून उचलून घेत खिशात घालत तेथून पलायन केले.या पकिटात 25800 रोखड व पन्नास हजार रक्कमेचा चेक होता.यांबाबत डिजिटल दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा सर्व प्रकार रेकार्ड झाला होता.याबाबत राजू दोडमणी यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.