जत,प्रतिनिधी : जत येथे विक्रम फाउंडेशनच्या वतिने जागतिक महिला दिनांनिमित्त बाजार पेठेतिल भाजीपाला विक्रेत्या महिलांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.या वेळी काँग्रेसचे नेते विक्रम सावंत,पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.अर्चना वाघमळे,सांगली कृ.उ.बा.स.सांगली संचालिका श्रीमती विनोदनी सावंत,नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर,नगरसेविका गायत्रीदेवी सुजय शिंदे,नगरसेविका अश्विनी माळी,उपाध्यक्ष राजेंद्र माने सर,विक्रम फाउंडेशन सदस्या,सौ.वर्षा ताई सावंत,कु.मिनल सावंत,सौ.मीरा शिंदे,कु.प्राची जोशी,सौ.विजया बिज्जरगी,सौ.गीता सावंत,सौ.जोती घाटगे,सौ.निलम थोरात,सौ.निता मालानी,सौ.भारती तेली,सर्व महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी सौ.अर्चना वाघमळे म्हणाल्या की,महिला बंधने झुगारून पुढे याव्यात यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे.सामाजिक कार्यातही महिलाचा पुढाकार कौतुकास्पद आहे.जत विक्रम फाउंडेश हे असेच महिला विकासासाठी काम करणारी संस्था आहे.शहारातील भाजीपाला विक्रेत्यांना महिलांना महिलादिनी छञ्याचे वाटप करत नाविन्यपुर्ण उप्रकम राबिवला.आज महिला या पुरुषाच्या बरोबरीने काम करीत असून आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी उन, वारा,पाऊसाची कोणतेही काळजी न करता व्यवसाय करीत आहे.भर उनातानात भाजीपाला विक्रेत्या महिलांना या छञ़्यामुळे उन्हापासून संरक्षण होणार आहे.असाच इतर संघटना,संस्थांनी विक्रम फाउंडेशनचा आदर्श घ्यावा असे आव्हान वाघमळे यांनी शेवटी केले.
विक्रम फाउंडेशनच्या सदस्या कु.मिलन सावंत म्हणाल्या की,विक्रम फाउंडेशनच्या वतीने सतत महिलांसाठी निरनिराळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्री वाटपाचा उपक्रम राबवित,सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.