बालगाव : 10 चेकडँम उभारणीने जत पुर्व भागात भविष्यात पाणी साठा वाढणार असून पिण्याच्या पाण्यासह पुर्व भागातील सिंचनापासून वंचित गावांतील शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.असे प्रतिपादन
आ.विलासराव जगताप यांनी केले.
जत पुर्व भागातील महत्वाकांक्षी बोर नदीवरील 10 चेकडँम बांधकामाचे भुमीपुजन आ.विलासराव जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.जत पुर्व भागाला वरदान ठरणाऱ्या बोर नदीपात्रात पाणी साठवण्याची सोय नसल्याने पावसाळ्यात येणारे पाणी कर्नाटकात वाहन जात होते.यासाठी नदी पात्रात चेक डँम बांधण्याचा प्रस्ताव आ.जगताप यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारकडे देण्यात आला होता.त्या बंधाऱ्यासाठी अखेर या 10 चेकडँमसाठी 9 कोटी 17 लाख रूपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. बोर नदीवरील सोनलगी न.1(जाधव शेत),सोनलगी 2 (मासाळवाडी जवळ),उमदी संगम,बालगाव,बेंळोडगी,खंडनाळ,पांढरेवाडी,जाळीहाळ 1 खु.(कमत शेत),जाळीहाळ खु. 2 (बिराजदार शेत), सिध्दनाथ येथील बंधाऱ्याचे उद्घाटन आ.जगताप सभापती सौ.सुशीला तावंशी, उपसभापती आडव्यप्पा घेरडे,माजी सभापती प्रकाश जमदाडे,भाजपचे कार्याध्यक्ष सुनील पवार,जि.प.सदस्य सरदार पाटील,सौ.स्नेहलता जाधव,सौ.मंगल नामद,सौ. सुनिता पवार,सौ.रेखा बागेळी,पं.स.सदस्या सौ. मंगलताई जमदाडे,सौ. श्रीदेवी जावीर,सौ.लक्ष्मी माळी,सौ.सुप्रिया सोनुर,सौ. कविता खोत,रामण्णा जिवन्नावर,मनोज जगताप, विष्णू चव्हाण व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
बोर नदीपात्रात उभारण्यात येणाऱ्या 10 चेकडँमचे उद्घाटन आ.विलासराव जगताप यांच्या हस्ते संपन्न झा ले.