संख | लोकसभा निवडणूक : उमदी पोलीसांची संखात बैठक |
संख,वार्ताहर : संख ता.जत येथे लोकसभा,विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी यासंदर्भात परिसरातील लोकप्रति नी,अधिकारी,पोलीस पाटील,सामाजिक संस्था व ग्रामस्थांची बैठक झाली.यावेळी सा.पोलीस निरिक्षक दत्तात्रेय कोळेकर अध्यक्षस्थानी होते.यावेळी माजी सभापती आर.के.पाटील,संरपच मंगलताई पाटील,आर.बी.पाटील,गुरूबसव पाटील,सुरेश पाटील,सुभाष पाटील,शंकर बागेळी,महादेव बागेळी,ग्रामसेवक नरळे व परिसरातील गावचे संरपच,पोलीस पाटील उपस्थित होते.सा.पोलीस निरिक्षक कोळेकर म्हणाले,निवडणूक काळात कोणत्याही अनुसूचित घटना घडू नयेत.भयमुक्त मतदान व्हावे यासाठी सर्वच घटकांनी काम करावे.कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,किबहुना असे कृत्य करणाऱ्यांनी माहिती पोलीसांनी द्यावी असे शेवटी कोळेकर म्हणाले.यावेळी नव्याने आलेले उमदीचे सा.पोलीस निरिक्षक दत्तात्रेय कोळेकर यांचा युवक नेते गुरूबसव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
संख येथे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित बैठकीत बोलताना सा.पोलीस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर