डफळापूर,वार्ताहर :पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारताच्या विमानांनी पाकिस्तानात घुसून त्यांची अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केल्याबद्दल भारतीय वायुसेना व लष्कराचे अभिनंदन करण्यात आले. भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत गावातून फेरी काढत,फटाक्याची आतषबाजीही करण्यात आली.तसेच पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्याबद्दल साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. डफळापूर मधिल मुख्य बाजारपेठ,दुकाने,शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांना पेढे,साखर वाटण्यात आली. यापुढे पाकिस्तानला अशाच पद्धतीने उत्तर द्यावे अशा घोषणा केल्या.येथील शिवगर्जना गणेश उत्सव मंडळ,पिंटू सरकार युवा ग्रुप यांच्या वतीने हे नियोजन करण्यात आले.