जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील पुर्व भागात सिंचन योजनेतून पाण्यासाठी आता शेतकरी,ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.आता निर्णायक लढा चिक्कलग्गी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली उभा करण्यात येणार आहे. पाणी द्या,अन्यथा 42 गावाचा येणाऱ्या निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकू,असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.त्यांच्या नियोजनासाठी माडग्याळ येथे 27 फेंब्रुवारीला भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. तेथे अंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. अशी माहिती तुकाराम महाराज यांनी पत्रकार बैठकीत दिली.यावेळी
अंकुश हुवाळे,तम्मा कुलाळ,माडग्याळचे संरपच इराण्णा जत्ती,अंबाण्णा माळी,शंशिकात माळी,महादेव माळी,जेटलिंग कोरे,गुरूकाका माळी,व्हनाप्पा माळी,पांडूरंग माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
तुकाराम महाराज म्हणाले,सततचे अवर्षणामुळे पुर्व भागातील 42 गावातील शेतकरी,जनता मरणावस्थेत आहे.दरवर्षी डिंसेबर पासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो.सरकारच्या उपाययोजनासाठी करोडो रूपयाचा चुराडा होतो.तरीही पुढील वर्षी तीच स्थिती कायम असते.त्यामुळे या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवायच्या असेलतर सिंचन योजनेशिवाय पर्याय नाही.त्यामुळे या भागात कुठूनही सिंचन योजना आखा,पण पाणी आले पाहिजे.यासाठी आम्ही आता आक्रमक झालो आहोत.सिंचन योजनेपासून वचिंत असलेल्या या 42 गावातून संघर्ष सुरू झाला आहे. अंदोलनाची मशाल पेटली आहे.
तुकाराम महाराज म्हणाले,मरणापेक्षा वाईट जीवन जगणाऱ्या या भागातील माझा प्रत्येक माणूस आता सरकारला जाग आणण्यासाठी मैदानात उतरणार आहे.त्यांच्या प्राथमिक तयारीसाठी 27 फेंब्रुवारीला माडग्याळ येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्राथमिक मतदानावर बहिष्कार,उपोषण,बंद,मोर्चा आदी प्रकारची अंदोलने करून सरकारला या भागातील नागरिकांच्या भावना पोहचविणार आहोत.आता पाणी आल्याशिवाय माघार नाही.संबधित यंत्रणेने त्यासाठी गतीने कामाला लागावे.सर्वच 42 गावाच्या सिंचन योजनेसाठी यापुढे तीव्र संघर्ष अटळ असल्याचे तुकाराम महाराज यांनी शेवटी सांगितले.