जत | शासनाच्या आरोग्य योजनाचा लाभ घ्यावा : आ.विलासराव जगताप,जतेत महाआरोग्य शिबीर संपन्न

0

  दीड हाजार रूग्णाची तपासणी 

 जत,प्रतिनिधी : शासनाच्या गरजू रुग्णांना विविध योजना आहेत.मुख्यमंत्री सहायता निधी,महात्मा फुले जन आरोग्य योजना,स्त्रियांवरील शस्त्रक्रिया मोफत आहेत.यांचा लाभ सर्वांना घ्यावा असे आवाहन आमदार विलासराव जगताप यांनी केले.ते जत येथील महाआरोग्य शिबिरांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.जत(ता.जत) येथे केंद्र शासनाच्या पुरस्कृत व राष्ट्रीय आरोग्य अभियान अतर्गंत महाआरोग्य शिबिराला उंदड प्रतिसाद लाभला.शिबीरात दीड हजार रुग्णांची तपासणी व प्राथमिक उपचार करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन आमदार जगताप व आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,भाजपचे कार्याध्यक्ष सुनिल आरपीआयचे संजय कांबळे,माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, अॅड.श्रीपाद अष्टेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.संजय साळुंखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ गिरी गोसावी,वैद्यकीय अधीक्षक अशोक मोहिते,आरोग्य अधिकारी दादासो पवार,मोहन भोसले यांच्यासह महात्मा फुले जन आरोग्य हाॅस्पिटलचे डाॅक्टर उपस्थित होते.

Rate Card

या महाशिबीरात त्वचारोग,लहान मुलांच्या शस्त्रक्रिया,ह्रदया संदर्भातील आजार,मोतीबिंदू,दंतचिकत्सक,पोटावरील विकार,मणक्याचे विकार,नेत्ररोग,कॅन्सर अशा सर्व प्रकारच्या आजाराच्या तपासण्या घेण्यात आल्या,काही रुग्णांना औषध,गोळ्या दिल्या. पुढील उपचार व शस्त्रक्रिया करिता महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून वैद्यकीय विभाग करणार आहेत. पाच लाखाचे आरोग्य विमाचे कवच असणारे गोल्डन कार्डाचे वाटप यावेळी करण्यात आले.महाआरोग्य शिबिर जिल्हातील जत व आटपाडीला या दुष्काळी तालुक्यात घेण्यात आले.

जत येथील महाआरोग्य शिबीर उद्घाटन प्रंसगी उपस्थित आ.विलासराव जगताप,सरदार पाटील,संजय कांबळे आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.