जिरग्याळ तलावाचे काम पुर्ण करू : आ.विलासराव जगताप,पाणी योजनाच्या पाईपलाईनचे उद्घाटन,जलपूजन

डफळापूर, वार्ताहर : जिरग्याळ ता.जत येथील महत्वाचा विषय असणाऱ्या लघु मध्यम प्रकल्प असलेला तलावाच्या रखडलेले काम पुर्ण करून पाणी टंचाई संपवू असे प्रतिपादन आ.विलासराव जगताप यांनी केले.
ते जिरग्याळ येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन उद्घाटन प्रंसगी बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, संरपच दिपक लंगोटे, पाणीपुरवठा विभागाचे अभिंयता श्री.कराळे,श्री.माळी,महानिंग कोरे,चिंंदानंद ढोले,नामदेव तुंगळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.जगताप यांनी योजनेच्या जलपुजनानंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.समस्या जाणून घेत मी लोकप्रतिनीधी म्हणून कायम काम करत आहे. पक्ष भेद विसरून कोणत्याही अडचणीसाठी थेट माझ्याकडे या त्यांबाबत लगेच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा करून मार्गी लावू.उपस्थित नागरिकांनी अनेक वर्षापासून रखडलेल्या तलावाच्या प्रश्न सोडविण्याची विंनती केली.त्यावर आ.जगताप म्हणाले,या तलावासाठी स्थानिंक लोकप्रतिनीधी प्रयत्न करणे गरजेचे आहे.काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला असेलतर त्यांच्यासह संबधित अधिकारी या सर्वांना एकत्र बसवून तो प्रश्न सोडवू.स्थानिंक पंचायत समिती सदस्य व गावातील शेतकरी यांच्याबरोबर प्रांताधिकारी यांना भेटून नुकसान भरपाई, जमिनीचे वाद मिटविण्यात येतील.या पावसाळ्याअगोदर तलावाचा बांध तुंबून पाणी साठा करण्यासाठी प्रयत्न करू असेही जगताप यांनी सांगितले.काही रस्ते,पाणी टंचाई, म्हैसाळ पाणी याबाबत ग्रामस्थांनी आमदारांच्या पुढे समस्या मांडल्या.यावर संबधित विभागाकडे हे विषय नेहवून सोडवू.त्याशिवाय गावातील कोणत्याही समस्या,गावातील समस्या सोडविण्यासाठी मी कठिबंध्द आहे.मात्र ग्रामस्थांनी यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे यावेळी आ.जगताप यांनी सांगितले.जिरग्याळ गावभागातील पाणी योजनेची पंचवीस वर्षापुर्वीची पाईपलाईन बदलून नविन पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. त्याद्वारे सुरू करण्यात आलेल्या पाण्याचे पुजन व योजनेचे लोकार्पन झाले.यावेळी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिरग्याळ ता.जत येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे उद्घाटन व जलपुजन करताना आ.विलासराव जगताप,दिग्विजय चव्हाण, दिपक लंगोटे व मान्यवर