येळवी,वार्ताहर : जत तालुक्यातील मौजे खैराव गावात पाणीटंचाई व अतिशय भीषण दुष्काळ पडल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.या परिसरातील दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी केंद्रिय पथक येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा,तालुक्यातील अधिकाऱ्यांनी दुष्काळी स्थितीची पाहणी करून आढावा घेतला.मंगळवारी प्रांताअधिकारी तुषार ठोंबरे सर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पाण्याअभावी कोरड्या पडलेल्या विहीरी,तलाव,जळालेली पिकांची पाहणी केली. पाण्याअभावी पिके ही जळाली आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये अशी अवस्था असून येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.पिके जळाली असल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे व पिण्यासाठी पाणी मिळवताना मोठ्या अडचणीचे ठरत आहे. शासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.दौऱ्यात तहसीलदार सचिन पाटील,मंडल अधिकारी भारत काळे, बुकटे, कृषी सहाय्यक पुजारी,पाणीपुरवठा विभागाचे मठपती, तलाठी वाघमोडे,कोतवाल बाळासाहेब चव्हाण,खैराव सरपंच राजाराम घुटुकडे, उपसरपंच रामचंद्र पाटील,माजी सरपंच नवनाथ चौगुले, खैराव ग्रामसेवक रवी कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
खैराव ता.जत येथील वाळलेल्या डांळिब बागाची पाहणी करताना प्रातांधिकारी तुषार ठोंबरे व अधिकारी