जत,प्रतिनिधी:जत शहरात गोबर व रुबेला लसीकरण बाबत जनजागृती फेरी काढण्यात आली.या फेरीचे उदघाटन लायन्स क्लबचे संस्थापक डाॅ.रविंद्र आरळी यांच्या हस्ते झाले.
गोवर व रुबेला हा प्राणघातक रोग आहे.त्यांचा प्रसार विषाणूद्वारे होते. सदृढ बालक व सशक्त निरोगी भारत याकरिता 9 महिने ते 15 वर्षे या वयोगटातील बालकांना लस टोचून घ्यावे.पोलिसो मुक्त महाराष्ट्र झाला आहे.त्याचधर्तीवर गोवर व रुबेला मुक्त महाराष्ट्र करण्याचे सरकारचे धोरण आहे.यास हातभार लावावे असे आवाहन यावेळी डॉ.आरळी यांनी केले. या गोवर रुबेला जनजागृती फेरीत उमा नर्सिग काॅलेजएस.आर.व्ही.एम काॅलेज, सिध्दार्थ नर्सिग काॅलेज जतचे विद्यार्थी,यांनी शहरात घोषणा देत फेरी काढली.यात वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांनी सहभाग घेतला.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.डी.जी.पवार,डॉ.हेमा क्षीरसागर,डाॅ.अभिजित पवार ,भगवान पवार आदी उपस्थित होते.
जत येथे जनजागृती फेरीचे उद्घाटन डाॅ.रविंद्र आरळी यांच्या हस्ते झाले.