18 वर्षे तळ ठोकलेल्या अभिंयता शेखच्या भष्ट्राचाराच्या चौकशीसाठी उपोषण

0

जत, प्रतिनिधी:तालुक्यातील बाज येथील मागासवर्गीयांवर अत्याचार करणाऱ्यांवर पोलीस कारवाईस टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ आरपीआयच्यावतिने जत तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.पुर्वी  मोर्चाही  काढण्यात आला होता.तसेच जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागात गेली  18 वर्ष तळ ठोकून असलेल्या अभियंता ए.ए.शेख यांने दलित वस्ती सुधारयोजनेत केलेल्या भष्ट्राचारांची चौकशी होऊन त्याला निलंबित करावे या मागणीसाठी हे उपोषण कर ण़्यात आले. आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.

  हेही वाचा: जत शहरात चोरीच्या सलग तीन घटनात लाखावर मुद्देमाल लंपास

Rate Card

यावेळी तालुका अध्यक्ष संजय पाटील,संभाजी चंदनशिवे, धोंडीराम चंदनशिवे,उत्तम विटेकर, किशोर चव्हाण,शिवाजी ऐवळे आदी उपस्थित होते. बाज येथील मागासवर्गीय कुटुंबातील तरूणांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.त्याचा गुन्हा जत पोलीसांत दाखल झाला आहे.सव्वा महिना झाला तरीही जत पोलीस संशयितांना अटक करित नाहीत. संशयित साक्षीदारांना धमक्या देत आहेत.यात तपास अधिकारी रणजीत गुंडरे यांची भुमिका संशयास्पद असून त्यांची खातेनिहाय चाैकशी करावी,अशी मागणी संजय कांबळे यांनी केली.

जत येथे विविध मागण्यासाठी आरपीआयच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.