माडग्याळ व टोणेवाडीतील भाजप कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

0

माडग्याळ,वार्ताहर : जत पूर्व भागातील भाजप पक्षातील माडग्याळ व टोणेवाडीचे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आटपाडी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

कृष्णा खोरे विकास महामंडऴ उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत माडग्याळचे ग्रामपंचायत सदस्य जेटलींग कोरे,टोणेवाडीचे माजी सरपंच माणीक नुलके ,ग्रामपंचायत सदस्य उत्तम नुलके,सिध्दु नुलके,तंटामुक्त अध्यक्ष परसु नुलके यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा: 18 वर्षे तळ ठोकलेल्या अभिंयता शेखच्या भष्ट्राचाराच्या चौकशीसाठी उपोषण

यावेळी तालुक्याच्या वतीने म्हैशाळ योजनेचे कामे गतीवे व्हावेत, माडग्याळसह वंचित आठ गावांना व संख सिध्दनाथ तलावाचे  सर्वेक्षण होऊन जत तालुक्यातील सर्व तलाव  भरण्यात यावे अशी मागणी भानुगडेपाटील यांच्याकडे करण्यात आली.नितीन बानगुडे पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडऴ उपाध्यक्ष (राज्य मंञी दर्जा) पदी निवड झाल्याबद्दल जत तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.   

Rate Card

     हेही वाचा: जत शहरात चोरीच्या सलग तीन घटनात लाखावर मुद्देमाल लंपास

यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तम्मासो कुलाळ,जत तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, तालुका उपप्रमुख सिध्दु माने(येळवी),दरीबडची जि.प.विभाग प्रमुख हरिश्चंद्र कांबळे,खड्नाळ शाखा प्रमुख रामा भुमरे,माडग्याळ शाखा प्रमुख सुखदेव माळी उपस्थित होते.

जत पूर्व भागातील भाजप पक्षातील कार्यकर्त्यानी  नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितत शिवसेनेत  प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.