जत | शहरात पार्किंगचा फज्जा |

0

जत,प्रतिनिधी:जत पार्किंगचा फज्जा उडाला असून अनेक ठिकाणी गाडी पार्क करण्यावरुन वाहनचालक व लगतचे व्यापारी यांच्यात खटके उडत आहेत. त्यामुळे ‘अहो…आम्ही गाडी कुठेे लावायची?’ असा सार्वत्रिक प्रश्‍न पडला आहे. पोलिस आणि पालिका प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आणि त्यात व्यापार्‍यांची हेकेखोरी यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या ठिकाणी वाहनचालक गाडी पार्क करण्यासाठी त्रासून जात आहेत.जत शहराचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे कमी रूंदीचे रस्ते आहेत. तसेच पालिकेने प्रमुख ठिकाणी पार्किंसाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. तसेच व्यापार्‍यांनी रस्ता आपलाच असल्याचा आव आणत दुकानासमोर 3 बाय 3 तर काही दुकानदार आपल्या मनमानी कारभाराप्रमाणे जागा वापरत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहने पार्क करण्यासाठी जागाच शिल्‍लक राहत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा:   

जत | तालुक्यांतील सव्वा लाख जनतेचा घसा कोरडा | टँकर मागणी असूनही लोकप्रतिनीधी,प्रशासन आढावा बैठकीपुढे सरकेना

शहरात स्टँड-हनुमान मंदिर मंगळवार पेठचा मार्गावर सतत वर्दळ असते. त्यामुळे वाहनांची गर्दी होत असते. या ठिकाणी रस्ता अरूंद असल्याने गाडी नेमकी लावायची कुठं?, असा प्रश्‍न नागरिकांना पडतो. नागरिकही जास्त लांब जाता येऊ नये, यासाठी कशीही गाडी पार्क करतात. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी झाल्याचे दिसते. असे असले तरी शहरात सर्वच ठिकाणी व्यापारी, किराणा माल, किरकोळ व्यवसायिक हे आपल्या दुकानासमोर लोखंडी स्टँड लावत असल्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न आणखी जटील होत आहे.पालिकेने या विषयाकडे सर्रास दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रश्‍न उद्भवला आहे. शहरात मोकळ्या असलेल्या जागांचा चांगल्या रितीने वापर होणे आवश्यक असताना त्या जागा पडून आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते,चौकात गाड्या अस्ताव्यस्तपणे लावलेल्या दिसतात. एखादा नागरिक गाडी पार्क करण्यासाठी आला असता व्यापारी व नागरिक यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गाडी लावायची कुठं? रस्ता नागरिकांचा की व्यापार्‍यांचा? पालिकेचा अतिक्रमण विभाग झोपला का? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.शहरात सर्वच ठिकाणी अशी अवस्था असल्यामुळे लवकरात लवकर कार्यवाही होणे गरजेचे आहे.

 हेही वाचा: 

Rate Card

जत | अन्यथा सांगोल्या पाणी देणार नाही,आमदार विलासराव जगताप यांचा इशारा |

  

रस्ते कमी पडू लागलेत….

शहरात पार्किंगचा प्रश्‍न जटील होत आहे. त्यामुळे रस्ते कमी पडू लागले आहे. यासाठी नवीन पर्याय शोधणे तर लांबच ज्यांच्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यांच्यावरसुध्दा कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक विभाग आणि पालिका एकमेकांवर ही जबाबदारी झटकत असल्याने हा विषय अधांतरी आहे. यामुळे मनमानी करणार्‍या काही व्यापार्‍यांचे फावले असून स्वत:चा व्यवसाय होण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.