जत | टंचाईचा मुकाबला करण्यास प्रशासन सज्ज : प्रांताधिकारी तुषार ठोंबरे |
जत तालुक्याची टंचाई आढावा बैठक
जत,प्रतिनिधी :तालुक्यावर दुष्काळाचे गंभीर सावट असून त्याचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. मागेल तेथे तातडीने टँकर दिला जाईल,अशी माहिती प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली. आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितित टंचाई आढावा बैठक येथील पंचायत समिती सभागृहात घेतली.यावेळी जि प चे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगाैडा रविपाटील, सभापती सुनंदा तावशी, जि प सदस्य सरदार पाटील,तहसीलदार सचिन पाटील, अप्पर तहसीलदार अर्चना पाटिल,गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे
माजी सभापती मंगल जमदाडे,पं. स.सदस्या श्रीदेवी जावीर, प्रभाकर जाधव,सुनिल पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा:

आमदार जगताप म्हणाले, शासनाने गंभीर दुष्काळी तालुक्यात जतचा समावेश केला आहे. दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. टँकर,रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत,अशी सुचना केली.तालुक्याच्या पूर्वभागातील दुष्काळ अधिक गंभीर आहे.अनेक लोक ऊसतोडणीसाठी स्थलांतर करित आहेत. बँकांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या सवलतीची त्वरीत अंमलबजावणी करावी,अशा सुचना लोकप्रतिनीधी केल्या.टँकर,रोजगार हमीची कामे,हातपंप दुरूस्ती, दुष्काळी सवलती यावर चर्चा झाली.