जत | तालुक्यांतील सव्वा लाख जनतेचा घसा कोरडा | टँकर मागणी असूनही लोकप्रतिनीधी,प्रशासन आढावा बैठकीपुढे सरकेना

0

जत,प्रतिनिधी :पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिकच गडद होऊ लागल्या आहेत. जत तालुक्यातील सुमारे सव्वा लाख जनतेचा घसा कोरडा असून, त्यांची तहान भागविण्यासाठी रानोमाळ फिरावे लागत आहे.गत वर्षे जिल्हाभरात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळ हा शब्दच जनतेला आठवला नाही. यंदा मात्र पावसाने दुष्काळाची आठवण करुन दिली आहे. यंदा सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झाला. त्यामुळे यंदा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातच पाणीटंचाईची चाहूल लागली.

हेही वाचा:   जत | टंचाईचा मुकाबला करण्यास प्रशासन सज्ज : प्रांताधिकारी तुषार ठोंबरे |

Rate Card

पुर्व भागातील सर्वच गावांना पावसाळी दिवसांतच टंचाईचे उग्र स्वरुप बघायला मिळाले आहे.ऑक्टोबर महिन्यात शासनाने जत तालुक्यांत गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे.मात्र पाण्यासाठी टँकर किंवा अन्य दुष्काळी सुविधेच्या नावाने बोब आहे.आढावा बैठकात लोकप्रतिनीधी, प्रशासन अडकून आहे.पाणी,जनावराच्या चाऱ्यांसाठी जनतेचा टाहो फोडत आहे.जतच प्रशासन जिल्ह्याकडे हात दाखवत आहे.गेल्या काही दिवसांपासून दुष्काळी झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात टँकर मागणीचे सुमारे 30 ते 35 गावांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रस्ताव कोन मंजूर करणार व कधी टँकर सुरू होणार हे प्रश्न अनुउत्तरीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.