सुभेदार बाळासो सोनलकर अंनतात विलिन, हिवरे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

जत,हिवरे (प्रतिनिधी): हिवरे (ता.जत) येथील रहिवाशी व भारतीय सेनेतील नायब सुभेदार बाळासो ज्ञानु सोलनकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अत्यंत शोकाकूल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभेदार सोलनकर अमर रहेच्या घोषणा देत त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला.
सुभेदार सोलनकर यांचे आसाम येथे देशसेवा बजावत असताना हृदय विकाराने शुक्रवारी (ता.9) रात्री निधन झाले होते. सेनादलाने त्यांना शहीद घोषित केले आहे. तीन दिवसांपासून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी हिवरे येथे आणण्यात आले. गावातील मुख्य चौकात दर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता.फुलांनी सजविलेल्या गाडीतून नायब सुभेदार बाळासो सोलनकर यांच्या पार्थिवाची अत्यंयात्रा काढण्यात आली. 

हेही वाचा :

माडग्याळ | नजिक अपघातात युवक ठार |

Rate Card

तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, जि.प.सदस्य महादेव पाटील, संरपच सौ.बंडगर ,युवक नेते विक्रम ढोणे,बंडू डोंबाळे,यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रंध्दाजली वाहिली.गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी देण्यात आला.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन सोनलकर हे 24 वर्षापुर्वी सैन्यदलात भर्ती झाले होते.देशातील विविध भागात त्यांनी तब्बल 24 वर्षे सेवा बजावली होती. शिपाई म्हणून रुजू झालेले बाळासाहेब सध्या नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. दोन महिन्यापुर्वी गावी येऊन पुऩ्हा ते सेवेत रुजू झाले होते. हिमाचल प्रदेशमधील सोलन एनसीसी युनिटमध्ये सेवा बजावताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले होते.निधनाचे वृत्त येताच हिवरे व परिसरात शोककळा पसरली होती.मंगळवारी त्यांचे पार्थिव हिवरे सर्व शासकीय सोपस्कर पुर्ण करून आणण्यात आले. तत्पुर्वी पुणे येथे त्यांना सैन्यदलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

हेही वाचा :

जत | जवळील अपघातात नागजचे व्यापारी ठार |

जवाना प्रती लोकप्रतिनीधी, राजकीय नेते व  प्रशासनाच्या संवेदना हरविल्या

तालुक्यातील हिवरे येथील नायब सुभेदार बाळासाहेब सोनलकर यांचे सैन्यात देशसेवा बजावताना शहीद झाले. त्यांच्या अत्यसंस्काराला तालुक्यातील प्रमुख नेते, वरिष्ठ अधिकारी यांची अनुउपस्थित संताप व्यक्त करणारी होती. देशसेवा करताना एक जवानाचा मुत्यू होतो. त्यांच्या पार्थिवास श्रंध्दाजली वाहण्यासाठी लोकप्रतिनीधी,राजकीय नेते अनुउपस्थित होते. तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित नव्हते. जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक उपस्थित रहाणे महत्वाचे असताना दुय्यम अधिकारी यावेळी उपस्थित राहिल्याने नागरिकांनी लोकप्रतिनीधी,व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुउपस्थित बद्दल संतापजंनक प्रतिक्रिया उमटल्या.

हिवरे ता.जत येथील शहीद जवान सुभेदार बाळासो सोनलकर यांच्या पार्थिवाची भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली.तहसीलदार सचिन पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करत,व सैन्यदलाच्या वतीने सुभेदार योंगेद्र,लाईफ इनफीड्रीचे घोघरे,हवलदार पाटील यांनी श्रंध्दाजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.