भक्तीमय वातावरणात लक्ष्मीपुजन

0

जत,प्रतिनिधी: दिवाळीतील महत्वाची पुजा असणारी लक्ष्मी पुजा तालुकाभर भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.दिवाळीची मुख्य दिवस म्हणून लक्ष्मी,कुबेर पुजनाचा दिवस मानला जातो.दुकाने,उद्योग,व्यवसायिक,त्याशिवाय घरोघरी वि धीवत लक्ष्मी करण्यात आले. सर्वांनी लक्ष्मीची पुजा करत आपल्या उद्योग,धंद्यात,घरात सुख,शांती लाभो,व्यवसायात बरकत देण्याचे साकडे घातले. जत तालुक्यातील सर्वच गावातील व्यापारी वर्ग बुधवारी लक्ष्मीपुजनाची सकाळ पासून तयारी केली होती.दुकानदारांनी आपला व्यवसाय उरकून लक्ष्मी पुजन वेळेला पुजनाचा वेळ साधली.भारतीय संस्कृतीत ऐश्‍वर्य आणि भौतिक सुखाचं प्रतीक म्हणून लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते. वैदिक साहित्यापासून पौराणिक साहित्यातही सौभाग्याची देवी म्हणजे श्री लक्ष्मी मानली गेली आहे. तिचे स्वरूप, तिचे अलंकार, तिचे गुणधर्म यासंदर्भात अनेक विवेचने उपलब्ध आहेत. भारतीय मनीषेची समृद्धी, कल्याण, आनंद यांच्याशी आस्था जोडणारी ही एक विशिष्ट शैली आहे. प्राचीन कालखंडात भारतीय जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपल्यासोबत आस्था, विश्‍वास, सचेतन असणार्‍या भारतीय परंपरा नेल्या. या परंपरा काळाच्या ओघात बहरल्या. या दिवशी बळीच्या बंदिवासातून सुटका झालेल्या लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरी कायम राहावे म्हणून मोठ्या भक्‍तिभावाने लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे.दुकानासमोर केळीची रोपे,नारळाच्या फरक्या,फुंलाच्या माळा,आंब्याची पाने,कवट,पुजनाचे साहित्य, दिवाळी फरळाचा नैवेद्य दाखविण्यात आला.रात्री लक्ष्मीपुजन झाल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली आहे. ती आज उत्तर पुजा झाल्यानंतर सुरू होतील.लक्ष्मीपुजनानंतर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.पावसाने दडी मारल्याने प्रांरभी बाजार पेठेवर निरउसाह होता,दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांना ग्रांहक मिळाले आहेत.रवीवार,सोमवार,बुधवारी जतची महत्वाची बाजारपेठेत मोठी गर्दी होती.त्यामुळे लक्ष्मीपुजनाला व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आंनद दिसत होता.तालुक्यातील संख,डफळापूर, उमदी,शेगाव,माडग्याळ,बिंळूर,या प्रमुख गावातील बाजारपेठात ग्राहकांनी बुधवारी सकाळ पासून गर्दी होती.लक्ष्मी पुजनाचे साहित्य, हार,नारळ खरेदी सुरू होती.त्यापुर्वी अगोदरचे दोन दिवस इतर खरेदी करण्यात आली.

Rate Card

संख येथे लक्ष्मीपुजनाचे साहित्य खरेदी करताना व्यापारी, नागरिक

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.