बेकायदा दारू वाहतूकीवर छापा,सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
जत,प्रतिनिधी:बेकायदेशीर दारू वाहतूकीवर जत पोलीसांनी छापा टाकत 1 लाख 28 हाजार आठशे रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
जत-कुंभारी रोडवरील बिरनाळ ओढापात्रा नजिक सोमवार रात्री साडेआठच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कैलास व्हनाप्पा कलाल रा.विजापूर रोड,जत यांला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती जत तालुक्यात बेसुमार बेकायदेशीर दारू वाहतूक सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर दारू वाहतूक रोकण्यासाठी जत पोलीसाचे पथक विविध मार्गावर तपासणी करत आहे.सोमवारी रात्री जत-कुंभारी रोडवर अल्टो एमएच-12,एक्यू-7109 या वाहनाची तपासणी केली असता.त्यात विदेशी दारूच्या 25,920 रूपये रक्कमेच्या 432 बॉटल आढळूंन आल्या.त्यासह वाहन जप्त करण्यात आले आहे.वाहतूक करणारा मालक कैलास कलाल याला जत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस कॉन्टेबल
केरबा चव्हाण यांनी जत पोलीसात फिर्याद दिली. अधिक तपास हवलदार राजू कांबळे करत आहेत.
