पाणी,चाराटंचाईने जतमधून स्थलांतर सुरू

0

जत,प्रतिनिधी:यावर्षी पावसाने जत तालुक्याकडे पाठ फिरवल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच जतमधील अनेक गावांमधून तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली असून माणसांना व जनावरांना प्यायला पाणी नाही त्यातच चाराटंचाई झाल्याने अनेकांनी स्थलांतर सुरु केले आहे.जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेळ्या व मेंढ्या,मोठी दुधाळ जनावराचे पालन करणारे शेतकरी आहेत.परिसरातील गायराने,वनजमीनीत गवतावर व शेतीतील पिकांच्या चाऱ्यावर येथील जनावरे जगविली जातात.यंदा पाऊस न पडल्याने पाणी व चाराटंचाई लवकरच जाणवू लागल्याने स्थलांतरही लवकर सुरू झाले आहे.अनेकांच्या मुलामुलींची लग्ने दिवाळीपूर्वी लावून मगच निघायचे असे असताना केवळ पाणी व चार्‍या अभावी लग्नाचे कार्यक्रम पुढे ढकलून शेळ्यामेंढ्यांबरोबरच इतर जनावरेही टेंपो, ट्रकमध्ये भरून इच्छित स्थळी घेऊन जात आहेत. घरी फक्त वयस्कर मंडळी मागे ठेवली जात असून काहींनी आपली मुले अगोदरच आसपासच्या आश्रमशाळांमधून पाठवली आहेत तर काहींनी  मुलांच्या शिक्षणाचा विचार न करता त्यांना आपल्याबरोबरच घेऊन जाण्यात धन्यता मानली आहे. तालुक्यातील काही शेतकरी कडबा, वाळलेली मका,पाण्याअभावी सुकलेला ऊस विकत आणून जनावरे जगवत आहेत. त्यातच कडब्याचा वाढलेला दर विचारात घेता अनेकांना ही वैरण घेणेही परवडत नाही. त्यामुळे त्यांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.गेल्यावर्षापासून जतमध्ये ब-याच मोठ्या प्रमाणावर शेतीपुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय वाढला होता, पण लगेच दुष्काळ पडल्याने महागाईने आणलेल्या संकरित गाई कवडीमोल दराने विकाव्या लागत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय कोलमडणार अशीच चिन्हे दिसू लागली आहेत.सांगली,सोलापूर,कोल्हापूर सारख्या शहरात एम.आय.डी.सीच्या रूपाने अनेक उद्योग धंदे असल्याने तेथे रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतो. मात्र,जतमध्ये डबघाईचे उद्योग वगळता,अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने सर्वसामान्यांना स्थलांतराशिवाय गत्यंतरच उरले नाही.

ऊसतोड कामगारांची घराला कुलपे 

Rate Card

दुष्काळी तालुक्यात एकीकडे  दुष्काळाचे सावट तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःची बिर्‍हाडं, लेकरंबाळं, वयोवृद्ध व जनावरांसहित ऊसतोडीसाठी ऊसतोड कामगार साखर कारखाना कार्यक्षेत्रात निघाले आहेत. त्यांनी आपल्या घराला कुलपे लावली आहेत. माण तालुक्यातील प्रामुख्याने दरिबडची, बोर्गी,जाळीहाळ,संख,तिकोंडी,गिरगाव,पांढरेवाडी,बालगाव,व्हसपेठ, माडग्याळ, सह परिसरातील गावे, वाड्या वस्त्यावरील उसतोडमजूर ऊसतोडीसाठी रवाना झाले आहेत.हीच स्थिती  बहुतांशी गावात आहे.याठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने ऊसतोडीशिवाय पर्याय नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.