प्रविण पाथरूट यांचे निधन
जत,प्रतिनिधी : जत तालुका स्पेशल गाडी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष व सिध्दविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्रविण पुंडलिक पाथरुट (वय-34, रा.आरळी कॉर्नर जत) यांचे सोमवारी रात्री एक वाजता ह्रदय विकाराने दु:खद निधन झाले. मंगळवारी सायंकाळी जत येथे हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात्य आई,पत्नी व एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.एक मनमिळावू,निस्वार्थ तरूण नेता,समाजहितासाठी झटणाऱ्या प्रविण यांच्या आकस्मित जाण्याने जत शहरात मोठी पोकळी निर्माण झाली.डफळापूर येथील दत्त परिवाराचे प्रविण सदस्य होते.परिवारातील सिध्दिविनायक पतसंस्थेचे ते व्हा.चेअरमन होते.दत्त परिवारातील महत्वाची पाथरूट यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. आपल्या प्रेमळ व तेवढ्याच आक्रमक स्वभावाने त्यांनी मोठा संस्थेचा नावलौकिक मिळवून दिला होता.कॉग्रेसचे युवक नेते गणेश गिड्डे व पाथरूट यांची जोडगोळी जत शहरात समाजकार्य करण्यासाठी परिचित होती.त्यातील पाथरूट यांच्या अचानक निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.जत बाजार पेठ बंद ठेवून त्यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली.दत्त परिवारातील संस्थेचे व्यवहार बंद ठेवत त्यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली.
