जतेत वाहन अडवून चालकांस लुटले,जनावरा बाजाराजवळची घटना ; सात जणाच्या टोळीचे कृत्य
एका संशयितास अटक
जत,प्रतिनिधी:शहरात जनावर बाजार परिसरात ऊसतोडणी मजूरांचे वाहन अडवून वाटमारी करण्यात आली. लाथाबुक्यानी मारहाण करून दोन ग्राम सोने व रोख चार हजार पाचशे रुपये लंपास केले. याप्रकरणी संशियत प्रकाश चव्हाण याच्यासह सात जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना रविवारी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विठोबा दादासाहेब माने (वय-50, रा.दरीबडची ता.जत ) यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.प्रकाश रुद्राप्पा चव्हाण ( वय ३० रा.सातारा रोड,पारधी तांडा जत) याला याप्रकरणी संशियत म्हणून अटक करण्यात आली आहे. इतर सहा संशयीत फरारी आहेत.विठोबा माने व निवृत्ती आवटी हे उसतोडणी कामगार आहेत.छोटा हत्ती गाडी क्रमांक एमएच -10,सिआर-0781 मधून इतर मजुरांसमवेत ते दरीबडचीहून विट्यास जात होते. प्रकाश चव्हाण याच्यासह सात जणांनी त्यांची गाडी आडवून त्यांना जबरदस्तीने जनावरे बाजारात नेले. माने यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख चार हजार पाचसे रुपये काढून घेतले.आवटी यांच्या तोंडावर व छातीवर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन ग्राम वजनाचे सोन्याचे ताईत हिसडा मारून तोडून घेतले. सदर घटनेनंतर माने यांनी जत पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी शोध घेवून प्रकाश चव्हाण या संशयीत चोरट्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक ए.डी. कत्ते करत आहेत.