बोर्गी परिसरात वाळू तस्कर,दक्षता कमिटीत उभा संघर्ष तलाठी,पोलीस पाटील, कोतवालावर दबाव : पोलीस, महसूलचे दुर्लक्ष

0

बोर्गी,वार्ताहर : बोर्गी परिसरातील बोर नदीपात्रात काही दिवसांपासून वाळू उपसा बंद होता,पंरतू पुन्हा वाळू तस्करी सुरु झाली आहे.सरकारी जीआर नुसार गावचे हे दक्षता समितीने अध्यक्ष संरपच आहेत तलाठी सचिव,पोलिस पाटील,कोतवाल,आदी सर्व सदस्य आहेत.गावात तस्कर विरुद्ध सरपंच उपसरपंच,पोलिस पाटील असा संघर्ष सुरू आहे.
पोलिस पाटलांना दमदाटी करण्यापर्यत वाळू तस्करांची मजल गेली आहे.दक्षता समितीमुळे काही दिवस वाळू तस्करी बंद होती.मात्र वाळू तस्कर धारदार शस्ञे घेऊन वाळू काढतात.त्याशिवाय त्यांटी दहशतीमुळे पोलीस बंदोबस्त गरजेचा आहे.मात्र महसूल विभागाचे पथक कधीतरी कारवाई करते,व वाळू पकडलेल्या गावातील दक्षता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस काढली जाते.प्रत्यक्षात शासकीय माहिती नुसार परिसरातील नदीपात्रातून सुमारे साहेसहा कोटीची वाळू तस्करांनी बेकायदेशीर उचलली आहे.सध्या परिसरात घरकूलांची कामे सुरू असल्याने वाळूचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.महसूलचे दुर्लक्ष,उमदी पोलीसांची हप्तेबाजी वाळू तस्करांला बंळ देत आहे.परिसरातील वाळूला मोठी मागणी असल्याने तस्करीला अधान आले आहे.विरोध करणाऱ्या पोलीस पाटील सह दक्षता कमिटीच्या सदस्यावर वाळू तस्करांचा दबाव आहे.
बोगीँ सह करजगी,बेंळोंडगी,मोरबगी,सुसलाद, सोनलगी आदि गावात तस्करी करणार्‍यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही होत आहे

बोर्गी परिसरात सुरू असलेली वाळू तस्करांनी नदी पात्रात मोठाले खड्डे 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.