सर्व्हिस रोड मुत्यूचा सापळा, जत-सांगली रोडवरील देवनाळ कालव्यावर पुल बांधकाम
व्ही वळणाने वाहने कॅनॉल मध्ये पडण्याची भिती
जत,प्रतिनिधी: जत-सांगली रोडवरील चव्हाण वस्ती नजिक देवनाळ कालव्याचे काम सुरू आहे.रस्त्यावरील पुलासाठी कॅनॉलच्या ठेकदारांने सर्व्हिस रस्ता काढला आहे.हा रस्ता करताना कोणताही नियम पाळला नाही.त्यामुळे तीनशे मीटर सर्व्हिस रस्ता साक्षात मुत्यूचा सापळा बनला आहे.या रस्त्यावरील व्ही वळण, खड्डे व सुरक्षिता नसल्याने रस्त्यावरून कधी वाहने कॅनॉलमध्ये जातील या नेम नाही.सध्या कामही बंद असल्याने पुढे किती दिवस वाहनधारकांना मरणयातना सोसाव्या लागणार असा संप्तत सवाल विचारला जात आहे.
देवनाळ मुख्य कालव्याचे काम गतीने सुरू आहे. जत-सांगली रोडवरील चव्हाण वस्ती नजिक हा कॅनॉल रस्ता पास करून जातो.तेथे शेतकऱ्यांनी अडविल्याने अनेक दिवस हे काम बंद आहे. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांचा वाद मिटला नसतानाही सर्व्हिस रोड काढण्यात आहे.प्रांरभी मुरम टाकून केलेला हा रोड सर्वच ठिकाणी खचला आहे.कॅनॉलच्या ठिकाणी मुख्य रस्त्यापासून सुमारे पाच फुट दरीत गेल्याचा भास वाहनधारकांना होतो.व्ही वळणामुळे मोठा धोका आहे. कॅनॉलच्या ठिकाणी कोणतीही संरक्षक भिंत नाही.बाजूचे दगड,खडक टाकून बांध केला होता.दोन आठवड्यापुर्वी झालेल्या पावसात तो बांधही वाहून गेला आहे. त्यामुळे त्या वाहने जाऊन कॅनॉलमध्ये पडण्याची भिती आहे.जत तालुका सांगलीला जोडणारा हा मुख्य मार्ग आहे.दररोज सुमारे दहा हाजार वाहने या मार्गावरून जा-ये करतात.त्यामुळे सर्व्हिस रस्ता डांबरीकरण करणे गरजेचे होते.मात्र वाहतूकीचे सर्व नियम पायदळी तुडवून हा सर्व्हिस रस्ता केला आहे. दिवसा रस्तावरून जाताना वाहने कॅनॉलमध्ये कोसळतील काय असा भास होतोय.रात्रीचा तर विचार न केलेला बरा.सर्व्हिस रस्ता करून एक दिवस मुख्य रस्तावर खोदकाम केलेे,मात्र लगतच्या शेतकऱ्यांच्या विरोध संपवला नाही.त्यामुळे एक दिवसानंतर काम बंद करण्यात आले आहे. तब्बल महिना होत आला तरीही काम सुरू नाही.मात्र सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.यापुढे कित्येक महिने या सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू राहणार आहे.त्यामुळे या रस्त्याचे मजबूतीकरण व कॅनॉलच्या वरच्या बाजूला संरक्षक कठडे उभा करण्याची गरज आहे.अन्यथा यापुढे एकाद्या वाहना अपघात होऊन मनुष्यहानी झाल्यास गंभीर परिणामाला संबधिताना सामोरे जावे लागणार आहे. तातडीने या सर्व्हिस रस्त्यावर मुरम टाकून रोलिंग करून मजबूतीकरण करावे अशी मागणी होत आहे.

जत-सांगली रोडवरील चव्हाण वस्ती नजिक धोकादायक सर्व्हिस रस्ता