माडग्याळला नव्या तालुक्याचे मुख्यालय करावे

0

माडग्याळ, वार्ताहर : संख-उमदी जुना वाद यामुळे माडग्याळ येथे तालुका व प्रशासकीय कार्यालये करालीतअशी मागणी आरपीआयच्या वतीने जत तहसीलदार यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,संख व उमदीचा धार्मिक वाद न संपणारा आहे.त्यामुळे संख किंवा उमदीला तालुका करणे मोठ्या अडचणीचे ठरणार आहे.भविष्यात अप्पर तहसील कार्यालयाप्रमाणे टोकाची अंदोलने होऊ शकतात.माडग्याळला तालुका करणे दोन्ही गावाचा विरोध नसणार आहे.माडग्याळ येथे तालुका व प्रशासकीय कार्यालये निर्मितीसाठी जागा आहे.त्याशिवाय मध्यवर्ती गाव असल्याने वाहतूक सुविद्या होऊ शकतात.त्याशिवाय राज्यभर माडग्याळी मेंढी,व माडग्याळी बोर प्रसिध्दी आहे.देशाच्या नकाशावर माडग्याळचे नाव येते त्यामुळे माडग्याळला तालुका व प्रशासकीय कार्यालये करावीत.कायम दुष्काळाने पिचलेल्या या गावचा विकास साधायचा असेलतर नव्या तालुक्याचे मुख्यालय होणे नैसर्गिक न्याय ठरेल.यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय कांबळे, लक्ष्मण कांबळे, बाबासाहेब कांबळे,बाळू कसबे,नागेश ऐवळे,राजू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

माडग्याळला नव्या तालुक्याचे मुख्यालय करावे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.