दरिबडची जि.प.मतदार संघाच्या सव्वा दोन कोटीच्या विकास कामांना सुरूवात

0

संख,वार्ताहर:जतचे कार्यसम्राट आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्या प्रयत्नातून दारीबडची मतदार संघात विविध योजनेसाठी 2 कोटी 19 लाखाचा निधी मिळाला आहे.त्यातून मतदार संघातील तेरा कामे नियोजित केली आहे.ती लवकरचं सुरू होणार आहेत.दरीकुनूर 30 लाख व जनसुविधा योजनेमधून 2.5 लाख,दरीबडची दलितवस्ती साठी 25 लाख नागरी सुविधा 4 लाख तीर्थक्षेत्र विकाससाठी 5 लाख,सिद्धनाथ दलितवस्ती साठी 15 लाख,पांढरेवाडी दलितवस्ती साठी 12 लाख व जनसुविधा योजनेतून नवीन ग्रामपंचायत बांधकाम 12 लाख,खंडनाळ दलित वस्ती साठी 15 लाख,मोटेवाडी साठी 8 लाख,पांडोझरी दलितवस्ती साठी 13 लाख  व पारधी वस्ती साठी 2.5 लाख,कागनरी दलित वस्ती साठी 19 लाख,आसंगी तुर्क दलित वस्ती साठी 5 लाख,तिकोंडी करेवाडी साठी 8 लाख,तिकोंडी साठी 30 लाख,गुलगुंजनाल दलित वस्ती साठी 10 लाख आसंगी जत दलितवस्ती साठी 19 लाख,जालिहाळ खुर्द 10 लाख म्हणजे दारीबडची मतदार संघात 2 कोटी 19 लाख निधी प्रत्यक्षात मिळाला आहे.कामेही सुरू झाली आहेत.त्याचबरोबर कोंतेबोबलाद साठी 3 हायमाक्स पोल मंजूर केले आहेत
मतदार संघातील जनतेच्या हिताच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कठिबंध्द आहे.जिल्हाला हेवा वाटील अशी कामे दरिबडची मतदार संघात येत्या चार वर्षात करू असा विश्वास जि.प.सदस्य सरदार पाटील यांनी व्यक्त केला. 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.