शेगावच्या बंद चौकीने गुन्हेगारीला बंळ,सर्वच धंदे तेजीत : चोऱ्याचे सत्र सुरू ; बेकायदा दारू,चंदन तस्करीचे उंगमस्थान

0

जत,प्रतिनिधी :शेगाव (ता.जत) येथील सततच्या बंद पोलिस चौकीमुळे चोरी,चंदन,दारू,मटका,जूगार अशा अवैद्य धंदे वाढले आहेत.त्याशिवाय यावर नियत्रंण असलेले पोलीसाची चौकी बंदने गुन्हेगारी बंळ मिळाले आहे.पोलीस फिरकत नसल्याने चोरीसह अनेक घटना नित्याच्या झाल्या आहेत.यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर लक्ष घालत ही चौकी कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील महत्वाचे गाव असणाऱ्या शेगाव येथे पोलीस बिट बनविण्यात आले आहे. त्यासाठी येथे पोलीस चौकी बांधण्यात आली आहे. या भागातील शेगाव,वाळेखिंडी,बनाळी,सिंगनहळ्ळी, आंवढी,लोहगाव,बेवनूर सह परिसरातील नागरिकांची रक्षक म्हणून ही चौकी आहे.मात्र गेल्या अनेक दिवसापासून येथे नेमणूक केलेले पोलीस कर्मचारी फिरकले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या चौकीचा कारभार जत शहरातून चालत असल्याने गुन्हेगारांना भिती उरली नाही.पोलीस नसतात असा समज या परिसरातील बेकायदा धंदे वाल्याचा झाला आहे.लक्ष्मीदर्शनाने या भागात सर्व काही अलबेल सुरू आहे. परिसरातील गावात अनेकवेळा व्यापाऱ्यांची दुकाने फोडून चोरट्यांनी चोऱ्या केल्या आहेत. शेगावमध्ये तर सहा महिन्यांपूर्वी एकाचवेळी आठ दुकाने फोडली होती. याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला. मात्र आजपर्यत चोरीचा छडा लागला नाही.तपास सुरू आहेच्या पुढे उत्तरे मिळत नसल्याने चोरी झालेल्या दुकानदारांना हा विषय सोडून दिला आहे. यात नेमका तपास कशात अडला हाही प्रश्न आहे.यापुर्वी या परिसरात चंदन, दारू तस्करीचे मोठे रँकेट सापडले आहे.अवैद्य दारू,मटकातर राजरोसपणे सुरू आहे.आंवढीत तर बेकायदेशीर दारू बंद करावी म्हणून महिलांना उपोषण करावे लागले होते.या परिसरातील हा क्राईम रेट कमी व्हावा, चोरांना कायमची जरब बसावी यासाठी शेगाव पोलिस चौकी कायमस्वरूपी खुली करण्याची मागणी आहे.             परिसरातील वर्षातील प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम व महत्वाचे मंत्री किंवा अधिकारी शेगाव परिसरात आले की,त्या दिवशी पोलीस चौकी खुली ठेवली जाते.मात्र इतर दिवशी कायम बंदच आहे. जत व सांगोला या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या प्रमुख राज्यमार्गावर ही पोलीस चौकी आहे.शेगाव परिसरात येणाऱ्या अनेक गावांत देशी-विदेशी मद्याची बेकायदेशीर पणे विक्री होत आहे.सांगोला तालुका सीमेवर असल्याने मटका व्यवसाय तेजीत असून या धंद्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे ही पोलीस चौकी कायमस्वरूपी खुली ठेवण्याची मागणी नागरिकातून होत आहे. 

Rate Card

शेगाव येथील कायम बंद असणारी पोलीस चौकी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.