स्पर्धेच्या युगात चमकतील असे विद्यार्थी बनवा : तम्मनगौडा रवीपाटील

0
3

बोर्गी, वार्ताहर: बोर्गी ता.जत येथील जि.प.केंद्र शाळेस शिक्षण सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांनी भेट दिली.शाळेतील मुलांची शैक्षणिक प्रगती,पोषण आहार,शिक्षकांची उपस्थिती याबाबत त्यांनी स्वत: तपासणी केली.उपस्थित शिक्षकांना शासनाच्या योजना,शैक्षणिक स्तर उंचविण्याच्या सुचना दिल्या.आपल्या भागातील प्रत्येक विद्यार्थी भविष्यात दर्जेदार गुणवत्ता धारक बनला पाहिजे,त्याशिवाय स्पर्धेच्या युगात चमकतील असे विद्यार्थी बनवा असे शिक्षण द्यावे असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.तालुक्यातील सर्वात मोठी केंद्र शाळा बोर्गी आहे.यात 26 शाळा,1 ते 7 कन्नड व ऊर्दू शाळांचाही समावेश़ आहे.शाळेसाठी महावितरने विभागीय कार्यालय जवळ असल्याने विद्यार्थांना धोका असल्याने संरक्षक भिंत व शौच्छालयाची गरज असल्याची मागणी यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सभापती रवीपाटील यांच्याकडे करण्यात आली.यावेळी भाजप नेते संजय तेली,उपसंरपच राघवेंद्र होनमोर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बसवराज निगडी,तम्माराया बिराजदार, अशोक बरडोल,दावल पुळूजकर,विठ्ठल कोळी,मताब सनदी,सुनिल नाईक,कल्लाप्पा बिराजदार, मुख्याध्यापक आरसगोंड व सर्व शिक्षक उपस्थित होते.

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here