जत,प्रतिनिधी: रामपूर ता.जत येथील जमिनीच्या बोगस वाटणीपत्र व खरेदी पत्राची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी शेतकरी रामू भिम्माण्णा मंडले हे तहसील कार्यालया समोर उपोषण बसले आहेत.रामपूर येथील मंडले यांनी आपल्या दोन मुले व एका मुलगीस प्रत्येकी 10 एकर प्रमाणे जमीन वाटून दिली आहे.उर्वरित जमीन रामू मंडले यांच्याकडे आहे.त्यांच्या मुलगा अजित मंडले यांच्या व्यसनी स्वभावाचा फायदा घेत जमीनचा व्यवहार काही कर्मचाऱ्यांनी संगनमतानी केला आहे. तो बोगस असून रद्द करावा.मी न्यायालयातही यावर लढाई सुरू आहे.असे मंडले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.