जत निर्भया पथकांचा आगळावेगळ्या कार्यक्रम महिला, मुलीवर अत्याचार रोकण्यासाठी मुलीच्या वादविवाद स्पर्धा

0

जत,प्रतिनिधी : जत विभागीय कार्यालयाअतर्गंत निर्भया पथकाकडून एक आगळावेगळ्या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिला,मुलीवरील अत्याचाराविरोधात सक्षमता आणण्यासाठी जतचे निर्भया पथक सतत कार्यरत आहे.
नुकत्याच त्यांनी घेतलेल्या “महिलांवरील अत्याचार केवळ कायद्याने थांबतील की समाज प्रबोधनाने” या विषयावर जत,कवटेमंहकाळ, उमदी पोलिस ठाणे हद्दीतील शाळेतील मुलीच्या वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या.अगदी चौकस,विविध प्रतिक्रियाने स्पर्धेचे वेगळेपण अधोरेखित झाले.या स्पर्धेत प्रथम पीयुपी कॉलेज, कवटेमंहकाळ, द्वितीय केएम हायस्कूल जत,तृत्तीय आऱआर महाविद्यालय जत यांनी क्रंमाक मिळविले.त्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
या कार्यक्रामाचे उद्घाटन डिवायएसपी शर्मिष्ठा वालावलकर यांचे हस्ते झाले. यावेळी भाजप नेते डॉ. रवींद्र आरळी, अॅड.प्रभाकर जाधव,पोलीस निरिक्षक राजू तहसिलदार, सा.पोलिस निरिक्षक भगवान सांळुखे,निर्भाया पथकाच्या प्रमुख वर्षा डोंगरे उपस्थित होत्या.
यावेळी डिवायएसपी वालावलकर यांनी पथकाच्या कामगिरीची माहिती उपस्थित मुली,महिलांना दिली.महिला,मुली सुरक्षिता याला पोलीसांचे प्राधान्य आहे.त्या अनुषंगाने असे उपक्रम आम्ही राबवत आहोत.या स्पर्धेच्या माध्यमातून महिला,मुलीवर अत्याचार कसे रोखता येतील, जागृत्ती कशी करायची,उपाययोजना काय करायच्या यावर वालावलकर यांनी मार्गदर्शन केले.जत उपविभागातील 30 निर्भया संखीना “निर्भया चिन्ह” वाटप करण्यात आले. विभागातील प्रत्येक महाविद्यालयातील दोन मुलींना निर्भया सखी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.त्यांना विशेष अधिकार प्रधान केले आहेत.यावेळी कोसारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास रोखून चांगले काम करणाऱ्या अमोल तुकाराम सांगोलकर यांला विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
निर्भया पथकांचे अभिजित यमगर,सुप्रिया पाटील, तोहिद मुल्ला,गोपाळ राठोड,गोविंद चव्हाण यांनी नियोजन केले.

Rate Card

जत येथे निर्भया पथकाकडून आयोजित वादविवाद स्पर्धेतील विजयी विद्यार्थीनी व उपस्थित मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.