आम्ही मरणावस्थेत आतातरी लक्ष द्या जत पुर्व भागातील शेतकऱ्यांची आर्त हाक

0


Rate Card

जत,प्रतिनिधी: सिमावर्ती जत पुर्व भागात पावसाने बहल दिल्याने रब्बी,खरीप हंगाम वाया गेल्याने आम्ही शेतकरी अखेरची घटका मोजत आहे.लगत्या कर्नाटकातील दुष्काळी गावात दुष्काळ जाहीर झाला तरी ‘महाराष्ट्र शासन कागदी घोडे नाचविण्यात गुंग आहे.शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी सुविद्या द्याव्यात अशी मागणी पुर्व भागातील नेते तथा बेळोंडगी सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे.
जत तालुक्यातील कर्नाटक,’महाराष्ट्र सिमावर्ती असणारा पुर्व भागातील उमदी, संख,जाड्डरबोबलाद, माडग्याळ, मुंचडी,कोतेबोबलाद हा परिसर कायम दुष्काळाशी झगडत आहे.गेल्या चार वर्षापासून अनियमित पाऊसाने शेतकरी देशोधडीला लागले आहेत.कोणतीही पिके हाताला येत नाहीत. रब्बीची ज्वारी,मका वाया गेलीत.तर खरीपातील बाजरी, मका,उडीद,तुर सारखी कडधान्ये वाळून गेली आहेत.शासनाने बहुचर्चित केलेला विमा भरला.मात्र हाताला तुटपुज्या रक्तमा मिळाल्या आहेत. पैसे मिळवून देणारी डाळिंब शेती कबाडकष्ठ करून उभा केली.त्याचेही पावसाअभावी जळण झाले आहे. पशूधन दुध दर व चाऱ्यांमुळे कसाबाला विकावे लागत आहे. तरीही शासन लक्ष द्यायला तयार नाही.आम्ही मरणावस्थेत आहोत.शेतकरी आत्महत्या करण्याअगोदर उपाययोजना करा अन्यथा मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या जत तालुक्यात दिसल्यास प्रशासन जबाबदार असेल असेही यावेळी सोमनिंग बोरामणी यांनी सांगितले.


मुत्यू झाल्यावर पाणी पाजापुर्व भागातील अनेक गावात सध्या तीव्र पिण्याची पाणी टंचाई आहे.जतचे प्रांताधिकारी, तहसीलदार फक्त आढावा बैठका घेत आहेत. प्रत्यक्षात पाणी काय मुत्यू झाल्यावर पाणी पाजणार का.?असा उद्गिन्न सवाल बोरामणी यांनी प्रशासनाला विचारला आहे.त्याशिवाय पाणी टंचाई,रोजगार नसल्याने गावे सोडण्याची वेळ अनेक कुंटूूबावर आली आहे.त्याकडे कोन लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.