खलाटीतील तरुणाच्या खूनप्रकरणी एकाला अटक,खंडूच्या धमकीला घाबरून गेम केल्याची संशियताची कबूली

0

जत,प्रतिनिधी : खलाटी (ता.जत) येथील खंडू सिद्धू नाईक यांच्या खून प्रकरणातील रावसाहेब तुकाराम शिंदे वय-25 या मुख्य सशयिंताला आरेवाडी येथून जत पोलिसांनी सापळा रचून पकडले.संशियत रावसाहेब शिंदे यांला खंडूने दिलेल्या जीवेमारण्याच्या धमकीला घाबरून खंडूची गेम केल्याची

कबूली संशियत रावसाहेब यांने पोलिसांना दिल्याचे पो.नि.राजू तासीलदार यांनी सांगितले.

गणपती मिरवणुकी दरम्यान जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या व्हरांड्यात शुक्रवारी ता.21रोजी रात्री दहा वाजता ही घटना घडली होती.खंडू नाईक हा तरूण नाईक वस्तीवरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती विसर्जन दिवशी दारू नशेत पडला होता.ही संधी साधत संशियत आरोपी रावसाहेब शिंदे यांने डोक्यात दगड घालून खून केला होता. मयत खंडूने रावसाहेब शिंदे याला गेल्या वर्षापुर्वी तंबाखूच्या कारणाने मारहाण केली होती.त्याशिवाय तो रावसाहेब याला अनेकवेळा तु या गावचा नाहीस,तुला जिंवत सोडणार नाही.असा दम दिला होता.त्यामुळे खंडू मला मारणार या दहशीत रावसाहेब होता.

Rate Card

संशियताने पोलिसांना दिलेला कबुलीनामा असा,आठ वर्षापुर्वी खलाटीत आलेल्या रावसाहेब मोलमजूरी करून राहत होता.मुळ जयसिंगपूर येथील असणाऱ्या रावसाहेब यांचे कुटुंबिय खलाटी येथे मोलमजूरी करून उदरनिर्वाह करत होते.गेल्या दोन वर्षापुर्वी रावसाहेब शिंदे यांचे भाऊ व आईचे निधन झाल्याने तो एकटात एका झोपडीत राहत होता.खंडू हा रावसाहेब यांला सतत घमकी,शिवीगाळ,मारहाण करत होता.त्यातून रावसाहेब खंडूच्या दशहतीला वैतागला होता.त्यांने गावातील पोलीस पाटील व काही नेत्यांना यांची माहिती दिली होती. तरीही काहीही फरक पडला नव्हता.खंडूच्या भितीने वैतागलेल्या रावसाहेब यांने खंडूचा कायमचा काटा काढायचा असे ठरविले होते.दरम्यान शुक्रवारी गणपती विसर्जना दिवशी ती संधी रावसाहेबला मिळाली.विसर्जन मिरवणूकीत दोघे ही नाचत होते.खंडूला दारू जास्त झाल्याने तो रस्त्यावर पडला.मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला लगतच्या जिल्हा परिषद शाळेच्या वऱ्हाड्यात झोपविले होते.यांची चर्चा रावसाहेब यांच्या कानावर गेली.त्यावेळी रावसाहेब यांने आज संधी आली आहे.खंडूचा गेम करू असे मनात ठरविले.प्रांरभी जिल्हा परिषद शाळेत रावसाहेब गेला.मध्यान्ह भोजनाच्या खोलीजवळचा सुमारे दहा किलो वजनाचा दगड त्यांने उचलला तो खंडूच्या डोक्यात घातला.रक्तस्ञाव झाल्याने खंडूचा जागेवर मुत्यू झाला.तोपर्यत विसर्जन मिरवणूक शाळेपर्यत आली.मिरवणूकीतील उजेडात खंडूच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.त्यादरम्यान संशियत रावसाहेब यांने गर्दीत जावून खंडूचा जीव गेला आहे का यांची खात्री करून घरी जाऊन झोपला.दुसऱ्या दिवशीपासून आठ दिवस कुडणूर,मिरज व ढालगाव असा प्रवास करून रावसाहेब ढालगाव येथे हॉटेलमध्ये कामाला लागला होता.त्यादरम्यान त्यांने गावातील एकाला फोन केल्याने त्यांचा सुगावा लागला.पोलिसांनी ढालगाव गाठत त्याला ताब्यात घेतले आहे. संशियत रावसाहेब यांने फरारी काळात आत्महत्या करण्याचा विचार आल्याचाही जबाब पोलिसांना दिला आहे.घटनेचा तपास जिल्हा पोलिस प्रमुखाच्या प्रमुख सुहैल शर्मा, डिवायएसपी शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो.नि.गजानन कांबळे,हवलदार बजरंग थोरात,सतिश माने,हरि खंडागळे,उमर फकीर यांनी कारवाई केली.

खलाटी ता.जत येथील तरूणांच्या खून प्रकरणातील पकडलेल्या आरोपीसह पोलीस निरिक्षक राजू तहसिलदार व त्यांची टीम

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.