जत | शिक्षण विभागावरील अन्याय दूर करावा सौ.मंगल जमदाडे ; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचेकडे मागणी | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी:शिक्षण विभागातील खेळखंडोबा व जत तालुक्यावर अनेक प्रलंबित ठेवून अन्याय होत आहे.तो दूर करण्यात यावा.अशी मागणी जत पंचायत समिती सभापती सौ मंगल जमदाडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.तसे निवेदन मंत्री मुंडे यांच्याकडे दिले आहे.
       निवेदनात पुढे म्हटले आहे की,जत तालुक्यातील शिक्षण विभागातील पदे समानतेच्या नावाखाली सद्या बदल्या करुन विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे.त्यांच्या गुणवत्तेवर यांचा परिणाम झाला आहे.इतर तालुक्यात शिक्षण विभागातील रिक्त पदाची आकडेवारी पाहता  ती 5 ते 7 टक्के आहे.त्या तुलनेत जत तालुक्यातील 22 टक्के पदे रिक्त आहेत.ती त्या जागा शिक्षण विभागाशी संबधित आहेत.तालुक्यात मराठी माध़्यमाच्या जिल्हा परिषद शाळा 299,तर कन्नड 131उर्दू 9 अशा एकूण 439 शाळातून विद्यार्थी शिकत आहेत. यात साधारणपणे 28हाजार 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शिक्षक,मुख्याध्यापक,शिक्षणविस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख याची 1,509 मंजूर पदापैकी 330 पदे रिक्त आहेत. सध्या तालुका अंतर्गत 430 शिक्षकाच्या बदल्या झाल्या आहेत.तर 37 शिक्षकाच्या बदल्या तालुका बाहेर झाले असल्याने 34 शाळा विना शिक्षक बनल्या आहेत.98 शाळेवर एकच शिक्षक राहणार आहे .केंदप्रमुखांची 11 पदे,शिक्षण विस्तार अधिकारी 3 इयत्ता 1 ते 7 पदाच्या शाळेत दोनपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.ही पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी सौ.जमदाडे यांनी केली आहे.
रिक्त पदामूळे विकास खुंटला
   पंचायत समितीत रिक्त जागेची सरासरी टक्केवारी 27%पदे रिक्त आहेत.यामुळे प्रशासनास कामे करताना अडचणी निर्माण होत आहे. पंचायत समिती गटविकास अधिकारी हे पदावर गेली 1 वर्षापासून प्रभारी गटविकास अधिकारी आहेत. तातडीने कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.शिक्षणाधिकारी,छोटेपाटबंधारे विभागातील उपअभियंता,एकात्मिक बालविकास उमदी विभागास अधिकारी प्रभारी आहेत.ते तात्काळ कायमस्वरूपी नेमणूक करावी.
         शासन शिक्षण व आरोग्य (मूलभूत गरजा) विभागास प्राधान्य दिल जात आहे,असे सांगितले जाते.परंतु याकडे दुर्लक्ष या रिक्त पदाच्या माध्यमातून होत आहे.आवश्यक त्या गरजा पूर्ण कराव्यात.पशुधन विभागात 14 पशुवैद्यकीय अधिकारी पैकी फक्त 3 पशुवैद्यकीय अधिकारी आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रात 16 वैद्यकीय अधिकारी पैकी 8 वैद्यकीय अधिकारी आहेत.
        या प्रलंबित मागण्याकडे तातडीने लक्ष देऊन सोडविण्यात यावे.असे सभापती सौ.जमदाडे यांनी म्हटले आहे.

चोकट

जत तालुक्यावर पुन्हा अन्याय

Rate Card

जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेतील आणखी एक मोठी त्रुटी समोर आली आहे. जिल्ह्यातील 86 शाळांमध्ये एकही शिक्षक राहिलेला नाही. या शाळा ‘शून्य शिक्षकी’ शाळा झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 36 शाळा जत तालुक्यातील आहेत. 36 पैकी 32 शाळा मराठी माध्यमाच्या व 4 शाळा कन्नड माध्यमाच्या आहेत. जत तालुक्यात शिक्षकांची रिक्त पदे वाढली असताना शून्य शिक्षकांच्या शाळांमध्ये जत तालुका आघाडीवर राहणार आहे. शिराळा तालुक्यातील 16, आटपाडी 10, कवठेमहांकाळ 5, मिरज 1, पलूस 2, तासगाव 5, कडेगाव तालुक्यातील 4 शाळा शुन्य शिक्षकी शाळा झाल्या आहेत. 

चौकट 2

जत तालुक्यात प्रमुख अधिकाऱ्यांची पदे प्रभारी
गटविकास अधिकारी          -प्रभारी
शिक्षणाधिकारी                 -प्रभारी
उपअभियंता छोटेपाटबंधारे  -प्रभारी
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी उमदी.                 -उमदी

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.