जत,प्रतिनिधी:
जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मेडिकल प्रवेशासाठी लागणाऱ्या नीट परीक्षेत यंदा बाजी मारली आहे.त्यालुक्यातील तीन विद्यार्थी नीट परिक्षेत चमकले आहे. न्यू इंग्लीश स्कूल अँण्ड ज्यूनि काँलेज आँफ सायन्स कुंभारी ता. जत येथील प्रज्वल प्रकाश तंगडी या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या नीट परिक्षेत 627 गुण मिळवून देशपातळीवर 151 वा क्रमांक पटकाविला आहे,सांगली जिल्ह्यात त्याचा पहिला नंबर आला आहे.त्याचबरोबर येळवी येथील कु. ॠतुजा गुलाब व्हनमाने हिने 448 गुण प्राप्त करून यश संपादन केले व सौरभ आप्पासाहेब व्हनमाने यांने 390 गुण मिळवून यश मिळवले आहे
त्यांच्या या दैदीप्यमान यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो: प्रज्वल प्रकाश तंगडी
कु.ॠतुजा गुलाब व्हनमाने
सौरभ आप्पासाहेब व्हनमाने







