येळवीे | ओंकारस्वरूपा संस्थेकडून झालेला सैनिकांचा सत्कार त्यांगाची,समपर्णाची जाणिव करून देणारा : गोडबोले | ww.samkettimes.com

0
11

येळवीे,वार्ताहर:ओंकार स्वरूपा फोंडेशन संस्था, येळवी या संस्थेचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सांगली यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी कॅप्टन सैनिक कल्याण आधिकारी श्री.सुनिल गोडबोले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रकाश पवार,संस्थेचे सचिव तथा ग्रां.प.सदस्य संतोष पाटील, युवा नेते बिरूदेव कुलाळ, प्रगती मार्केटींग कंपनीचे मालक शिवाजी क्षिरसासागर  उपस्थित होते.यावेळी सुनिल गोडबोले म्हणाले ओंकार स्वरुपा फौंडेशन 
या संस्थेच्या माध्यमातून यावर्षी येळवी महोत्सव 2018 मध्ये “विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. या गौरव सोहळ्यात देशासाठी शहीद झालेल्या “शहीद वीर जवाना”च्या पत्नीचा गौरव, देशासाठी त्यागी व समर्पित आयुष्य जगलेल्या माजी सैनिकांचा व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींचा यथोचित गौरव व सन्मान केला. हा विशेष गौरव सोहळा अनेकांना गहिवरुन सोडणारा होता, डोळ्यात अश्रुंची गर्दी करुन, मनात हुंदका दाटला. भारतीय सैनिकांविषयी सामान्य जनतेच्या मनात असणारी आपुलकी,आदर, आत्मियता व त्यांच्याविषयीचा अभिमान वाढविणारा हा सोहळा ठरला. सैनिकाच्या त्यागाची, समर्पणाची, देशभक्तीची समाजाला जाणीव होण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे.या आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी “जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली” यांच्याकडुन प्रशस्ती पत्र देऊन ओंकार स्वरूपा फोंडेशन संस्थेला  सन्मानीत करण्यात येत आहेत. यापुढेही असेच लोकहिताचे कार्य संस्थेकडून घडावे असेही यावेळी गोडबोले यांनी सांगितले.

येळवी: येथील ओंकारस्वरूपा संस्थेला जिल्हा सैनिक कार्यालयाकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here