जत | 9 जूनला मोफत जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन | www.sankettimes.com

0
8

जत,प्रतिनिधी: स्व.ह.भ.प.नारायणराव सुबराव जगताप यांचे स्मृतिप्रित्यर्थ जत येथील जि.प.शाळा न.1 (शिवाजी पुतळ्याजवळ)मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबीराचे आयोजन केले आहे.या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सभापती तम्माणगोंडा रवीपाटील यांनी पत्रकार बैठकीत केले.यावेळी आ.विलासराव जगताप,पंचायत समिती सभापती मंगलताई जमदाडे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बि.एस.गिरीगोसावी,माजी सभापती प्रकाशरावजी जमदाडे, जि.प.सदस्य सरदार पाटील, रेखाताई बागेळी,आप्पासाहेब नामद,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.जी.पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रवीपाटील पुढे म्हणाले,जत सारख्या दुष्काळी परिस्थिती महागडे उपचारास मर्यादा पडतात.हलाक्याच्या स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना उपचार व्हावेत,सामान्य जनतेच्या आरोग्य समस्याचे निदान व मोफत औषधोपचार व्हावा या उद्देशांनी हे आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे. यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना,स्ञीरोग,बालरोग,नाक-कान,घसा,दंतरोग,ह्रदयरोग,त्वचारोग,मधुमेह,अस्थिरोग,वैद्यकशास्ञ,प्रजनन संस्थेचे आजार आदी रोगावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन मिळणार आहे. आयुर्वेद,होमिओपॅथी या औषधी पध्दतीचा मोफ उपचार,प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा अभियान,दिव्याग मित्र,देहदान,अवयवदान,नेत्रदान,व रक्तदान शिबिर,जननी सुरक्षा योजना,जननी शिशू योजना,आरोग्य सल्ला,बालविवाह,स्ञीभ्रुण हत्या विरोधी कायदा,धुम्रपान दष्परिणाय या विषयी मार्गर्शन या शिबिरात मिळणार आहे.
मोफत रक्त,लघवी,हिमोग्लीबिन,रक्तगट इ.तपासणी, मोफत ई.सी.जी,गरोदर माता 0-5 वर्षे वयोगटातील लसीकरण,पुरूष नसबंदी,शस्ञक्रिया,स्ञी नसबंदी शस्ञक्रिया, पाळणा लांबविणेची साधने,डोळ्याचे नंबर तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्ञक्रिया, महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत 971 विकारावरील उपचार,शस्ञक्रिया येथे करण्यात येणार आहेत. त्यामुळे जत तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रवीपाटील यांनी केले आहे.शिबिरासाठी सांगलीतील नामवंत हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांकडून यावेळी तपासणी करण्यात येणार आहे.9 जून 2018 ला सकाळी 10 ते सायं 5 पर्यत,जि.प.शाळा नं.1 शिवाजी पुतळ्याजवळ जत येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here