वळसंग | सोरडी फाट्याच्या प्रवाशांना मिळाली सावली | www.sankettimes.com
पंचायत समिती सदस्या अश्विनी चव्हाण यांच्या निधीतून पिकअप शेडचे स्वप्न साकार
वळसंग, वार्ताहर :
वर्षानु वर्षे ऊन वारा पावसात प्रवाशी आपल्या वाहनाची वाट बघत बसतो बसायला दोन ग्रामपंचायतीची मोडकी बाकडे सोडलं तर दुसरी सोय नाही. जत-चडचण मुख्य रस्ता रहदारी जास्त प्रमाणात. गुड्डापूर सारख्या पावन श्री.क्षेत्राला जाण्यासाठी एक महत्वाचा मार्ग म्हणून वळसंग नजीक असलेल्या सोरडी फाट्याकडे आज पाहिलं जात. संखला शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा इतर प्रवाशांना सावली आणि आडोसा म्हणून कोणतीच सोय नव्हती. पण मुचंडी गणाच्या पंचायत समिती सदस्या अश्विनी चव्हाण यांच्या निधीअंतर्गत पिकअप शेडचे काम पूर्ण झाले.आणि यामुळे मुख्य सावलीचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे सर्वत्र या लोकप्रतिनिधी सौ. चव्हाण यांचं कौतुक होते आहे.

सदर पीक अप शेडमुळे अनेकाना सगळ्या ऋतूमध्ये आडोसा होणार आहे. आणि गावकरी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन यावेळी पंचायत समिती सदस्या चव्हाण यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच मनीष चव्हाण, माजी सरपंच शंकर टिळे, ग्रा.पं. सदस्य बापू चव्हाण, चव्हाण ग्रुपचे संचालक धोंडीराम चव्हाण , संतोष बिरादार आदी उपस्थित होते.
सोरडी फाटा येथे पंचायत समिती सदस्या अश्विनी चव्हाण यांच्या निधीतून बांधलेले एसटी पिकअप शेड