गुगवाड | भाजप नेते चिंदानंद चौगुले यांच्याकडून वज्रवाड मध्ये मोफत पाणी पुरवठा | www.sankettimes.com
गुगवाड, वार्ताहर : वज्रवाड ता.जत येथील तीव्र पाणी टंचाईच्या पाश्वभुमीवर भाजप नेते तथा सोसायटीचे चेअरमन चिंदानंद चौगुले यांनी स्व:खर्चातून मोफत पाणी वाटप करण्यात येत आहे.
वज्रवाडमधिल पाणी योजनाचे पाणी स्ञोत बंद पडल्याने सध्या पाणी टंचाई तीव्रता वाढली आहे.नागरिकांचे हाल सुरू आहेत.शासनाकडूनही यावर उपाययोजना सुरू नाहीत. त्यामुळे लोकहितासाठी काम करणारे चौगुले यांनी स्व:ताच्या ट्रक्टरमधून दररोज दोन खेपा द्वारे नागरिकांना पाणी वाटप सुरू केले आहे.वेगवेगळ्या गल्ली,वाड्यावस्त्यांना ट्रक्टर मधील ट्रकरने पाणी वाटप करण्यात येत आहे.चौंगुले यांच्या बद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

भाजप नेते चिंदानंद चौगुले यांच्याकडून वज्रवाड मध्ये मोफत पाणी पुरवठा करण्यात येत आहे.