जत | पंचायत समितीत विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रांरभी सभापती सौ.मंगल जमदाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपसभापती शिवाजी शिंदे, पंचायत समिती सदस्या सौ. श्रीदेवी जावीर,शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. शिंदे प्रमुख उपस्थितीत होते. प्रा. रविंद्र कांबळे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याबद्दल तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः स्त्री.कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या तरतुदी इत्यादीबाबत आपले विचार मांडले.
सूत्र संचालन राजू कांबळे सर यांनी तर सदाशिव वारे यांनी आभार मानले.कार्यक्रमास पंचायत समिती जतच्या सर्व विभागाचे अधिकारी, पदाधिकारी तसेच केंद्रप्रमुख जयवंत वळवी, प्रशांत कांबळे, रणवीर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जत पंचायत समितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती साजरी करण्यात आली.
