जत | जतसाठी सुसज्ज बसस्थानकाच्या कामासाठी प्रयत्न : आ.विलासराव जगताप | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी :
जत पंचायत समिती येथील ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सर्व कामे बंद आहेत. यामुळे तालुक्यातील वैयक्तिक लाभार्थ्याचे फार मोठे नुकसान होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन आमदार विलासराव जगताप यांनी रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट काााार करण्याचे पत्र दिले.
पत्राद्वारे ग्रामीण रोजगार हमी योजनमधून नवीन कामे सुरू करण्याची व जुन्या कुशल व अकुशल कामांची बिले दिल्याशिवाय नवीन कामे सुरु होणार नाहीत. त्यामुळे जुन्या कामांची बिले त्वरित द्यावीत अशी मागणी केली.

त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री पंकाजाताई मुंडे यांच्याकडे अगोदर मंजूरीसाठी असणारी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 1 कोटी 50 लाख रुपयांची विकास कामे सुचविली होती.शासनाच्या संशोधन व विकास कार्यक्रम अंतर्गत कामे सुचविली आहेत. यामध्ये आसंगी तुर्क ते लामाणतांडा (एल 44), आसंगी तुर्क ते माळावस्ती (एल 43), आसंगी तुर्क ते लमाणतांडा (एल 45),जाडर बोबलाद ते बिराजदार वस्ती (एल 436), को. बोबलाद ते लमाणतांडा (एल 28), साळमळगेवाडी ते नरुटे वस्ती (एल 165) या रस्त्यांचा समावेश आहे.तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग मिळून एकूण 14 रस्ताची प्रजीमा म्हणून दर्जोन्न्ती (अपग्रेडेशन) करण्यासंबधीचे पत्र बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना दिले यामध्ये आसंगी (जत) तिल्याळ दरीबडची जालीहाळ खुर्द ऐगनाळ कर्नाटक हद्द रस्ता,माडग्याळ आसंगी (जत) लमाणतांडा ते पांढरेवाडी रस्ता,शिंगणापूर-जिरग्याळ-बिळूर ते खोजनवाडी ते कोटटलगी कर्नाटक हद्द रस्ता, हुन्नुर सोलापूर जिल्हा हद्द जाडर बोबलाद उटगी रस्ता,लवंगी उटगी ते हळळी रस्ता,रा. मा. 125 पासून तिप्पेहळळी कोसारी गुळवंची बेवनूर ते जुनोनी रस्ता, माडग्याळ लकडेवाडी जाडर बोबलाद ते लवंगी सोलापूर हद्द, रा. मा. 156 अचकनहळळी बनाळी अंतराळ रस्ता,शिंगणहळळी आवंढी अंतराळ वायफळ ते निगडी खु. रस्ता,माडग्याळ प्रजीमा 70 ते मायथळ कुणीकोणूर येळवी (पारे) ते सोलापूर हद्द,रा. मा.155 ते वाषाण कंठी बागेवाडी ते प्रजीमा 65 ला मिळणारा रस्ता,बागेवाडी कुंभारी हिवरे ते (ढालगाव) क. महांकाळ तालुका हद्द,रा. मा.155 (वळसंग) सोर्डी तिल्याळ रस्ता, व्हसपेठ गुडडापूर सोर्डी ते दरीकोणूर रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. सदर रस्त्याचे अपग्रेडेशन झाल्यास शासनाच्या बजेट मधून रस्त्यांची कामे करणेकामी निधीची तरतूद करता येईल.
जत बसस्थानकाची सोलनकर चौक येथील 5 एकर जागा उपलब्ध आहे. सध्याच्या बस स्थानकामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी होत आहे. यासाठी आमदार जगताप यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते,राज्यमंत्री विजय देशमुख यांना सोलनकर चौक येथील जागेमध्ये नवीन बसस्थानक तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठीचे पत्र दिले. तसेच जत मुंबई शिवशाही बस सेवा सुरु करण्याची मागणी केली.वरील सर्व कामांचा पाठपुरावा संबधित मंत्र्याकडे आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे लवकर हि कामे मंजूर होतील.