कुंभारी |शेगाव मतदार संघातील काम कौतुकास्पद :संग्रामसिंह देशमुख | www.sankettimes.com

0

शेगाव मतदार संघातील काम कौतुकास्पद 

Rate Card

जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख : मतदार संघातील विविध विकास कामाचे उद्धाटन

जत,प्रतिनिधी : दुष्काळी जत तालुक्यातील प्रश्नाची जाण आहे.त्यामुळे जत तालुक्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक योजना दिल्या आहेत. म्हैसाळ योजना,रस्ते,वैयक्तिक लाभागाच्या योजनात गतीने राबवून तालुक्यातील जनतेला विकास पर्वात आणण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.

ते शेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रंसगी बोलत होते.

 शेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव व अॅड. प्रभाकर जाधव यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकास कामे व सार्वजनिक कामाचे उद्धाटन जिल्हा परिषद अध्यक्षा संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती तम्मानगौंडा रवीपाटील, सदस्य सरदार पाटील,गुरू बिजरग्गी,राजू जावीर,उपसंरपच प्रदिप जाधव,जी.बी.माळी,संभाजी माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

कुंभारी येथील अमुल दुध चिलिंग सेंटर,कुंभारी हायस्कूलच्या सोलर पँनल,विज्ञान प्रयोगशाळा,सह विविध कामाचे उद्धाटन देशमुख यांनी केले. शिवाय कुस्ती केंद्रास भेट दिली.

देशमुख पुढे म्हणाले, कुंभारी गावातील शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे.अत्याधुनिकता प्रयोगशाळा, विजेसाठी स्वयंपुर्ण यंत्रणा शाळेच्या खर्चात बचत होईल.शेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील जलसंधारणाचे काम कौतुकास्पद आहे.त्याचे व म्हैसाळ योजनचे फलित म्हणून शेत-शिवार हिरवेगार दिसत आहेत. योग्य नियोजन मतदार संघाचा कायापालट करेल.यापुढे शेगाव मतदार संघातील विकास योजनासाठी आम्ही तातडीने मंजूरी देऊ अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.

अॅड.प्रभाकर जाधव म्हणाले,जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेगाव मतदार संघात कोट्यावधीचा विकास निधी आणून कामेही सुरू केली आहेत.जनावराचे गोठे,व्यक्तिगत लाभाच्याही मोठ्या प्रमाणात योजना आणल्या आहेत.म्हैसाळ योजनेसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नामुळे जत पश्चिम भागातील अनेक गावातील शेतकरी सक्षम झाला आहे. ऊस,बागा,मकासह हंगामी पिके जोमदार आली आहेत. आम्हा जिल्ही परिषद, कुंभारी ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेनी निवडून देत जो विश्वास दाखविला आहे.तो सार्थ ठरवून शेगाव जिल्हा परिषद मतदार संघ आदर्श बनवू असेही शेवटी जाधव म्हणाले.

कुंभारी येथील शाळेच्या सौर पँनेलचे उद्घाटन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,तम्माणगोंडा रवी,सौ.स्नेहलता जाधव,अॅड.प्रभाकर जाधव व मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.