गुगवाड | उपसा बंदी नोटीस देऊनही तलावातील पाणी उपसले | www.sankettimes.com

0

गुगवाड मधील स्थिती : पुढच्या आठवड्यात ग्रामस्थाना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार

गुगवाड,वार्ताहर : येथील तलावातील पाणी उपसा थांबविण्यात यावा अशी श्री सिध्देश्वर पाणी वापर संस्था नोटीस बजावली होती.तरीही पाणी उपसा चालूच राहिल्याने तलावातील पाणी पातळी झिरो पातळीच्या खाली गेली आहे.या तलावातून गुगवाडकरांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होत आहे. सध्या पाणी पुर्णतः अखेरीला आले आहे. संपूर्ण गाव या तलावावर अवलंबून आहे.सध्या पाणी पातळी खालावल्याने 

Rate Card

ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेतून ग्रामस्थांना 8 किंवा 10 दिवसात एकदा होत आहे. अजून उन्हाळा किमान दोन ते तीन महीने असताना अशी स्थिती आहे.पुढील आठ दिवसात उर्वरित पाणी संपल्यास ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे.तलावातील पाणी साठा ग्रामस्थासाठी राखीव असताना व पाणी उपसा बंद करण्याची नोटीस देऊनही सुद्धा पाणी उपसा केल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याचा खर्च शासनाला करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.काहीच्या भल्यासाठी ग्रामस्थाना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येणार आहे. तहसिलदार अभिजित पाटील यांनी याप्रकरणी लक्ष घालून सध्या शिल्लक पाणी साठा राखीव ठेवावा यासाठी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

गुगवाड ता.जत येथील तलावातील नियमबाह्य पाणी उपसा केल्याने तलाव कोरडा पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.