येळवी | ग्रामपंचायतीच्या वतीने “सुकन्या ठेव योजना”| www.sankettimes.com

0

येळवी, वार्ताहर :येळवी ता.जत येथील ग्रामपंचायतीत सोमवारी झालेल्या मासिक बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेत ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाद्वारे मुलींच्या जन्माचे स्वागत 

Rate Card

करण्यासाठी आलेल्या तरतुदीप्रमाणे, ” सुकन्या ठेव योजना ” सुरू करण्याचा महत्वपुर्ण ठराव घेण्यात आला. यामध्ये 1मार्च 2017 ते  31मार्च 2018 ज्याना कन्यारत्न (मुलगी) जन्माला आली  आहे. त्या कन्येच्या नावावर 18 वर्षासाठी ठेव पावती रक्कम रूपये 3,000/- किंवा वित्त आयोगातील ठरवलेल्या तरतुदीनुसार जन्मदराच्या समान रक्कम त्या कन्येचा नावाने ठेव पावती ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय येळवीचे लोकनियुक्त सरपंच, विजयकुमार पोरे (मालक) यांच्या संकल्पनेतुन. तसेच उपसरपंच सुनिल अंकलगी व ग्रामपंचायतीचे सर्व सन्मानीय सदस्यांचा सर्वांनुमते हा निर्णय घेण्यात आला.मुली जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.