संख | पांढरेवाडीत वाळू तस्करी करणारा डंम्पर पकडला | www.sankettimes.com
संख,वार्ताहर : पांढरेवाडी ता.जत येथील ओढापात्रातून उपसा केलेली वाळू तस्करी करणारा डंम्पर पांढरेवाडी चौकीतील पोलिसांनी पकडत वाळू जप्त केली.
जत तालुक्यातील अवैद्य वाळू तस्करी रोकण्यासाठी जत,उमदी,पोलिस व महसूल विभागाच्या वतीने मोहिम उघडली आहे.त्यांची अनेक पथके दिवसरात्र अनेक वाळू ठिकाणावर गस्त घालत आहेत.शनिवारी पांढरेवाडीत वाळू भरलेला ट्रक पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिला.पोलिस फौजदार गरज,व पोलिस शिपाई चंदनशिवे यांनी धाडसकरत ही कारवाई केली.
