जत | सागर बोराडेचा खूनच | www.sankettimes.com

0

अपघातचा बनाव करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या : आर्थिक व्यवहारातून झालेला भांडणाचा रागाने तिघांनी केले कृत्य

जत,प्रतिनिधी : शेगाव ता.जत येथील सागर शहाजी बोराडे यांचा मंगळवारी सध्याकांळी जत-आंवढी रस्त्यावर झालेला अपघात हा बनाव असून आर्थिक व्यवहारातून सागरचा खून केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली आहे.लोहगाव येथील ठेकेदार उमेश काशिद यांने मेहुण्यांना बरोबर घेऊन सिमेंटचा ट्रकने धडक देत सागरचा खून केला आहे,याप्रकरणी तिंघांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून अजून काही आरोपी असण्याची शक्यता असल्याने संपुर्ण प्रकरणाच्या मुळापर्यत आम्ही लवकरच पोहचू अशी माहिती डिवायएसपी नागनाथ वाकुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पोलिस निरिक्षक राजू तासिलदार उपस्थित होते. 

खून पचविण्यासाठी तिंन संशयित आरोपींनी संगनमत करून पाळत ठेऊन सागर शहाजी बोराडे यांचा खून केला आहे.याप्रकरणी ठेकेदार उमेश काशिद, त्याचा मेहुणा रोहित भोसले व राहूल भोसले यांना ताब्यात घेतले आहे. 

ता.13 मार्चला शेगाव -आंवढी रोडवर मित्र अनिल बोराडेस घरी सोडण्यासाठी सागर शहाजी बोराडे दुचाकी वरून जात असता पाठीमागून ट्रकने धडक दिली होती. त्यात सागर बोराडेचा जागीच मुत्यू झाला होता, तर अनिल बोराडे गंभीर जखमी झाला होता.याबाबतचा अपघाताचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला होता. मात्र संबधित सागर बोराडेचे कुंटुबिय व गावकऱ्यांना हा अपघात नसून खूनचा प्रकार असल्याचा संशय आल्याने त्यांनी व पोलिसांनी ट्रक शोधून काढत चालक रोहित आण्णासो भोसले रा.अंतराळ यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला असता, त्यांने उमेश धोंडिराम काशिद रा.लोहगाव भाऊ याने कट रचून सागर यास ट्रकने धडकावून खून केल्याची  कबूली दिली आहे.

सागर बोराडे यांच्या घर बांधकामाचा ठेका उमेश काशिद या ठेकेदारास दिला होता. उमेशचे काम व्यवस्थित नसल्याने त्यांचे काम थांबवत हिशोब केला होता.हिशोबातील सुमारे एक लाख रूपये देणे असल्याने सागर यांने उमेशची चारचाकी गाडी काढून घेतली होती. त्यांचा राग मनात धरून उमेश काशिद यांने मेहुण्यांना बरोबर घेत सागरची गेम केली आहे.

Rate Card

सायंकाळी झालेल्या अपघात चालक रोहित भोसले यांने त्याच्या ताब्यातील ट्रकने धडक देत सागरचा खून केला तर अनिल बोराडेस जीवे मारण्याचा प्रयत्न करून जखमी केले आहे. त्याला उमेश व राहूल यांनी साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर गुन्ह्यातील परिस्थिजन्य पुराव्यावरून व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जत पोलिस,स्थानिक गुन्हे शाखा,व सांगलीचे विशेष अधिकारी असा समांतर तपास करत चौवीस तासात गुन्हा उघडीस आणून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. 

गुन्ह्यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, ट्रकही पुणे येथून रात्री उशिराने ताब्यात घेण्यात आला आहे. यापुढे आणखीन काही आरोपी असण्याची शक्यता असल्याने तसा तपास सुरू आहे.असेही शेवटी वाकुर्डे यांनी सांगितले.

शेगावमधील नागरिकांची सतर्कता

सागर बोराडेचा अपघात झाल्यानंतर शेगाव मधील काही नागरिकांनी सतर्कता दाखवत धडक दिलेल्या ट्रकला शोधत पुणे पर्यत पाठलाग केला.त्यांच्या बरोबर संशयित ठेकेदार उमेश काशिद हाही होता.रोहित भोसले चालक असलेल्या ट्रक तिन दिवस शेगाव परिसरात संशस्पाद स्थितीत फिरत होता.त्यामुळे काहींना ह्या ट्रकने धडक दिल्याचा संशय आला,तर ठेकेदार उमेश यांच्याही सांगण्यात संशस्पाद गोष्ठी आढळल्याने नागरिकांनी पुणे येथील डेपोवर गेलेला ट्रक व त्यांचा डायव्हर रोहित भोसले याला पकडून शेगाव मध्ये आणले,सतंप्त नागरिकांनी रोहितला फटके दिल्यावर रोहितने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.शेगाव मधील नागरिकांनी सतर्कता दाखविल्याने पोलिसांना मोठी मदत झाली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.