जत |जत-मुंचडी रोडवरील दरोड्यातील मोकळा टेम्पो सापडला | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी :बुधवारी रात्री विजापुर-गुहागर मार्गावर मुंचडी हद्दीतील पाच्छापूर ओढापात्राजवळ बुधवारी रात्री पळविलेला बेदाणे भरलेला टेम्पो जत पोलिसांच्या पथकाला जत-अथणी रोडवरील तेलसंग क्रॉस येथे मोकळ्या स्थितीत आढळून आल्याने तपासाला गती आली असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळू असे डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे यांनी सांगितले.

बुधवारी कर्नाटकातील चलवादी ता.सिंदगी येथील शेतकऱ्यांचा बेदाणा भरून तासगावला चाललेल्या आयशर टम्पोवर धुम स्टाईलने दरोडा घालून बेदाण्याने भरलेला टेम्पो,मोबाईल व रोकड असा 24 लाख 24 हाजार 900 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

जत तालुक्यातील मुंचडी ते जत दरम्यान असलेल्या लिंग ढाब्यापुढील ओढापात्राजवळ बुधवारी रात्री दरोड्याचा प्रकार घडला.यामध्ये चालक संगनबसू शरणाप्पा डोणूर (वय-32),महातेंश शिवाप्पा खरकबी,(वय-30),सुर्यकांत धर्माण्णा नायकवडी (वय- 35)सर्वजण राहणार चलवादी ता.सिंदगी जि.विजापूर हे तिघे जखमी झाले होते.

Rate Card

दरम्यान गुन्हा दाखल होताच जत पोलिसांची पथके कर्नाटक सिमावर्ती भाग,सोलापूर,विजापूर परिसरात आरोपींची शोध घेत असताना घटनेतील टेम्पो आढंळून आला आहे. टेम्पो बेदाणे चोरट्यानी पळवून नेहली आहेत.मोकळ्या स्थितीतील अथणी-विजापूर रोडवरील तेलसंग क्रॉस नजिक टेम्पो आढंळून आला आहे. जत पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.