खडतर संघर्षातून नेते तयार होतात,त्यासाठी संयम हवा : आ.विलासराव जगताप

0

डफळापूर, वार्ताहर : खडतर संघर्षातून नेते तयार होतात,त्यासाठी संयम हवा,परशुराम चव्हाण सर यांनी तसे आदर्श घेऊन काम करावे,त्यांना राजकारणात भविष्यात मोठ्या संधी आहेत, असे प्रतिपादन आ.विलासराव जगताप यांनी केले.

ते डफळापूर येथील युवक नेते परशुराम चव्हाण सर यांच्या वाढदिवस 

कार्यक्रमात बोलत होते.माजी सभापती मन्सूर खतीब,सौ.देवयांनी गावडे,गणेश डेअरीचे दादाशेठ पांढरे,अंकलेचे नेते शंकर वगरे,ए.ए.तेली,सोसायटी चेअरमन हुसेन आत्तार,संरपच श्रीमती बालिकाकाकी चव्हाण, उपसंरपच प्रतापराव चव्हाण, संभाजी माळी,अरविंद गडदे आदी मान्यवरांची उपस्थित होते.

आमदार जगताप पुढे म्हणाले,कार्य करत असताना चांगले काम करावे लागते.चांगल्या गोष्ठीचे संवर्धन बदल घडविते.राजकारणात धाडस महत्वाचे लागते,तरच यश मिळते.स्वार्थी समाजाला चांगली दिशा देण्यासाठी प्रंसगी अंगावर वार झेलून काम करण्यासाठी उभे रहावे,ते बंडू चव्हाण यांनी करावे.चव्हाण सर हे लहान आहेत,त्यांनी संयम ठेऊन लोकहिताचे काम करावे.राजकारणात मी 19 वर्ष संघर्षातून मला आमदार होता आले आहे.त्यामुळे संघर्ष केल्यानंतर फळ मिळतेच.हे युवकांनी स्विकारावे,धर्माच्या पलिकडे मानवता हा धर्म मानून यापुढे जाती व्यवस्थेचे बिज पेरणाऱ्या विचारांना मुतमाती द्यावी. जातीजातीतील वैर,विकृत्ती संपविणे महत्वाचे आहे.आमदार,खासदार फंडातून डफळापूरला निधी देऊ,कामे करण्यासाठी मला जनतेनी निवडून दिले आहे.तिन वर्षात जातीव्यवस्था तमा न बाळगता काम करत आहे.जातीव्यवस्था मोडून काढून पुरोगामी विचार आणून समानता आणणे गरजेचे आहे.तसा प्रयत्न युवकांनी करावा असे आ.जगताप शेवटी म्हणाले

Rate Card

मन्सूर खतीब म्हणाले,आम्ही कृतृवान युवकांला डफळापूरच्या राजकारणात आणले आहे.डफळापूरच्या रखडलेल्या विकासाला गती आणण्यासाठी पक्ष,गट विसरून गावाला प्रगतीवर नेहावे.चांगला विचार मोठा करावा

येथील बुवानंद मंदिराजवळ भव्य वाढदिवस साजरा करण्यात आला.परिसरातील पदाधिकारी,कार्यकर्ते,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाढदिवसाचे नियोजन फेड्स ग्रुप व विवेकांनद फाऊडेंशच्या वतीने करण्यात आले.

डफळापूर : येथील युवक नेते परशुराम चव्हाण सर यांचा वाढदिवस आ. विलासराव जगताप,माजी सभापती मन्सूर खतीब आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.