राजोबावाडी दरोडा : चोरट्याचा सुगावा नाही
जत,प्रतिनिधी : राजोबावाडी (व्हसपेठ) येथे शनिवारी पहाटे पडलेल्या सशस्ञ दरोड्याचे अद्याप धागेदोरे हाती लागले नाहीत.जत पोलिसाची पथके अनेक ठिकाणी चोरट्याचा शोध घेत आहेत.

राजोबावाडी येथील भाजीपाला व्यापारी रामा मनगिंना ठेंबरे यांच्यासह पत्नी सुंदराबाई व नातू सुशांत नवत्रे यांचे हातपाय बांधून तलवारीचा धाक दाखवत घरातील रोख 1 लाख 60 हाजार रक्कमेसह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला होता.नातू सुशांत यांने घसरत येऊन आजोबा रामा यांची दोरी सोडल्याने तिघांनी सुटका करत शेजाऱ्यांना उठवून जत पोलिस ठाणे गाठले होते.जतचे डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे, पोलिस निरिक्षक राजू तासिलदार यांनी घटनास्थळी जात अनेक भागात नाकाबंदी केली होती.काही भागात जत उमदी पोलिस ठाण्याचे कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापामारी केली होती.मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.सांगली येथून श्वान पथक,फिंगर प्रिंटचे पथकांनी नमुने घेतले आहेत.रविवारी दिवसभर विविध भागात पोलिसाची पथके चोरट्याचा शोध घेत आहेत. रविवारी सायकांळ पर्यत चोरट्याचे पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. मात्र तपास गतीने सुरू असून लवकरचं चोरट्याच्या मुशक्या आवळू असे पोलिस निरिक्षक राजू तासिलदार यांनी सांगितले.